चिनोदा : अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आणि त्यानंतर गेल्या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च झाला. मात्र दुरुस्तीनंतर पुढच्याच वर्षी रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याला पुन्हा एकदा गळती लागली असून, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. सांडव्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याने लाखो रुपये पाण्यातच गेले, असेच म्हणावे लागेल. (Rozwa Sandva leak next year after repair)