SAKAL Impact : शहादा तालुक्यात बोगस कापूस बियाणे पकडले; कृषि विभागाची कारवाई

SAKAL Impact : एचटीबीटी बोगस कापूस बियाणासह अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त केला.
District Agriculture Development Officer Kishore Hadpe, Sub Divisional Agriculture Officer Tanaji Kharde, District Quality Control Inspector Swapnil Shelke along with the suspects selling bogus 'HTBT' cotton seeds.
District Agriculture Development Officer Kishore Hadpe, Sub Divisional Agriculture Officer Tanaji Kharde, District Quality Control Inspector Swapnil Shelke along with the suspects selling bogus 'HTBT' cotton seeds.esakal
Updated on

Nandurbar Fake Seed : गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाने शहादा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कार्यवाही करीत प्रतिबंधित एचटीबीटी बोगस कापूस बियाणासह अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त केला. शहादा व सारंगखेडा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांबाबत फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाभरात कृषी विभागाने पथके स्थापन केली आहेत. (Bogus cotton seeds caught in Shahada taluka )

या पथकाला सोमवारी (ता.२७) मिळालेल्या गुप्त महितीचा आधारे नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अनरद व शहादा येथे प्रतिबंधित एचटीबीटी बोगस कापूस बियाण्याची पाकीटे जप्त करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, नाशिक विभागाचे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी नीतेंद्र पानपाटील यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, पकडलेले बियाणे शहादा व सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत सापडल्याने दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शहादा पोलिस ठाण्यात स्वप्निल शेळके यांनी रमाकांत वंजारे व त्याचा साथीदार, उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. तर सुरेश साठे यांनी सारंगखेडा पोलिस ठाण्यात हिरालाल महाजन व उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस तपासातून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यामधील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

District Agriculture Development Officer Kishore Hadpe, Sub Divisional Agriculture Officer Tanaji Kharde, District Quality Control Inspector Swapnil Shelke along with the suspects selling bogus 'HTBT' cotton seeds.
Nandurbar Fake Seed Case : दर वर्षी अनधिकृत बियाण्याचा सुळसुळाट वाढतो कसा? प्रशासनानेच पावले उचलण्याची अपेक्षा

असा पकडला माल

सोमवारी (ता.२७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नंदुरबारचे कृषि विकास अधिकारी किशोर हडपे, शहाद्याचे उपविभागीय कृषि अधिकारी तानाजी खर्डे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्निल शेळके, मोहिम अधिकारी सचिन देवरे, शहादा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश साठे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, श्री. पेंढारकर, महेश विसपुते यांच्या पथकाने दुपारी चारपासून पाळत ठेवून अनरद येथील खासगी व्यक्ती हिरालाल महाजन यांच्या राहत्या घरी व रात्री नऊ वाजता खासगी व्यक्ती रमाकांत वंजारे व त्याच्या साथीदाराला शहादा येथे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले.

''प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनीही काळजी घ्यावी.''- मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

सकाळने फोडली वाचा

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या बोगस, प्रतिबंधित व अनधिकृत बियाण्यांच्या सुळसुळाटाविषयी ‘सकाळ’ने वाचा फोडली आहे. या बियाण्यांच्या विक्रीला लगाम लागावा. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ‘सकाळ’ने २४ मेपासून वृत्त मालिका सुरू केली आहे. या मालिकेचे अनेक प्रगतिशील व सधन शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

District Agriculture Development Officer Kishore Hadpe, Sub Divisional Agriculture Officer Tanaji Kharde, District Quality Control Inspector Swapnil Shelke along with the suspects selling bogus 'HTBT' cotton seeds.
Nandurbar Fake Seed Business: अनधिकृत बियाणे विक्रीला लगाम हवा; परवानाधारक कृषी सेवा केंद्रांची भूमिका महत्त्वाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.