SAKAL Impact : शहाद्यातील लिकेज अखेर पाणीपुरवठा विभागाकडून बंद

SAKAL Impact : डोंगरगाव रोडवरील शहादा न्यायालयाला लागून असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अस्वच्छ पाटचारीत पालिकेच्या पाणीपुरवठ्याची नळ जोडणी तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात होते.
Workers closing the broken tap connection in Patchari near the court.
Workers closing the broken tap connection in Patchari near the court.esakal
Updated on

SAKAL Impact : येथील डोंगरगाव रोडवरील शहादा न्यायालयाला लागून असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अस्वच्छ पाटचारीत पालिकेच्या पाणीपुरवठ्याची नळ जोडणी तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात होते. शिवाय पाटचारीतील सांडपाणी तुटलेल्या नळ जोडण्यांमधून पुन्हा वाहिन्यांमध्ये जात असल्याने पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अस्वच्छ पाणी शहरवासीयांना प्यावे लागत होते. परिणामी शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्न उभा राहिला होता. (Leakage in Shahada finally closed by water supply department)

मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाइप लिकेज ची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ तुटलेल्या नळ कनेक्शनमधून वाहणारे पाणी बंद केले. शहरातील डोंगरगाव रोडवरील शहादा न्यायालयाला लागून पाटबंधारे विभागाची पाटचारी आहे. या पाटचारीत शहरातील सांडपाणी सर्रासपणे सोडले जाते. पाटचारीत नेहमी घाण व दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असते. या पाटचारीत शहादा न्यायालयासमोर व न्यायालयाला लागूनच असलेल्या जुन्या रिकाम्या तहसील निवासस्थानासमोर दोन ठिकाणी पालिकेच्या नळ जोडण्या तुटलेल्या होत्या. (latest marathi news)

Workers closing the broken tap connection in Patchari near the court.
SAKAL Impact :...अखेर गंजमाळ चौकातील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी

याबाबत ‘सकाळ’ ने शुक्रवारी (ता.२८) ‘पिण्याचे पाणी थेट गटारीत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर तुटलेल्या नळ जोडणीतील पाणी पाटचारीत वाहत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया तर जातच होते शिवाय पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर हे दूषित पाणी पुन्हा नळाद्वारे जलवाहिन्यांमध्ये साचून राहिल्याने पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर तेच दूषित पाणी नागरिकांना नळाद्वारे घरापर्यंत जात होते.

परिणामी शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी लिकेज बंद करण्यासंबंधी नागरिकांची मागणी होती. अखेर पालिका प्रशासनाला जाग येऊन पाटचारीतील लिकेज तत्काळ बंद करण्यात आले.

Workers closing the broken tap connection in Patchari near the court.
SAKAL Impact : ...अन्‌ चौकीची झाली स्वच्छता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.