Nandurbar News : विद्यार्थ्यांची दर शनिवारी दप्तराच्या ओझ्यापासून सुटका

Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school here
Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school hereesakal
Updated on

तळोदा : आठवड्यातून एक दिवस तरी विद्यार्थ्यांना दप्तरापासून मुक्ती मिळावी यांसाठी तळोदा शहरासह तालुक्यातील असंख्य शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

यादिवशी वह्या-पुस्तकांचा वापर न करता, कृतिशील अध्ययन-अध्यापनावर विशेष भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या आवडीच्या विविध स्पर्धा, कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (Nandurbar school conducts an activity name is daptaravin shala students like this activity Nandurbar news)

Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school here
Jalgaon News : मुद्दे संशयास्पद अन्‌ वादही Scripted... गांभीर्य नको!

शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः लहान मुलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांची पाठ्यपुस्तक असतात. विद्यार्थी रोजच दप्तरातून या विषयांची वह्या, पुस्तके, स्वाध्याय पुस्तिका नेतात. सामान्यतः ग्रामीण भागातील काही विद्यार्थी पायी तर काही विद्यार्थी सायकलवरुन पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन शाळेत दररोज ये-जा करतात.

दरम्यान, विद्यार्थ्यांना एखादा घटक मनोरंजक पद्धतीने शिकविला तर ते लक्ष केंद्रित करुन अध्ययन करतात, हे हेरुन विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस का होईना पण दप्तराच्या ओझ्यापासून मुक्ती मिळावी यांसाठी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या सूचनेनुसार तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school here
Nashik News : स्थलांतरानंतरही ‘अडचणीचे’ शुक्लकाष्ठ कायम!

या उपक्रमाचे जवळपास सर्वच शाळांनी, शिक्षकांनी स्वागत केले असून शनिवारी दफ्तरविना शाळा भरविण्यास सुरवात देखील केली आहे. या उपक्रमासाठी एक कृतीयुक्त आराखडा तयार करण्यात आला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी अध्ययन अनुभव देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययनाचा अनुभव -

शनिवारी शाळेत आठवडाभर शिकवलेल्या घटकांवर प्रश्नमंजूषा तसेच चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी, भाषण, गीतगायन, योगासने, शब्दांची अंताक्षरी, क्रीडा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भाषा, गणित, इंग्रजी विषयांच्या साहित्य पेटीचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यात येत आहे. त्यामुळे मुले मुक्तपणे अध्ययनाचा अनुभव घेत आहेत.

Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school here
Nashik News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून 28 हजारांचा नायलॉन मांजा जप्त

"दप्तरमुक्त शाळा ही संकल्पना शैक्षणिक अधिष्ठानावरच आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होत त्यांना नावीन्यपूर्ण अनुभव यावेत, शिक्षकांना देखील दैनंदिन कामाकाजापेक्षा वेगळी अनुभूती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय."

- शेखर धनगर, गटशिक्षणाधिकारी, तळोदा

"दप्तरमुक्त शनिवारमुळे विद्यार्थ्यांना यादिवशी एक वेगळाच अनुभव मिळत असून विद्यार्थी मनसोक्त आनंद लुटत आहेत. यादिवशी शाळेत कृतीयुक्त सहभागावर भर देत विद्यार्थ्यांना विविध विषयांचा साहित्यपेटीचा वापर करीत अध्ययन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळत असल्यामुळे ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे."

- अभय सराफ, मुख्याध्यापक, नवागाव

Navagaon: Teacher Sonali Dalvi is giving a pleasant learning experience to the students by using supplementary educational materials in the school here
Nagpur News : नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नाही - डॉ. सुनील देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.