Nandurbar Monsoon News : धुवाधार वृष्टीने शहादा जलमय! पाणी शिरल्याने घरे, दुकानांचे नुकसान; ग्रामीण भागात शेतीचे नुकसान

Nandurbar News : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसामुळे शहादा शहर जलमय झाले.
Water entering the State Bank premises in Shahada city
Water entering the State Bank premises in Shahada cityesakal
Updated on

Nandurbar News : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसामुळे शहादा शहर जलमय झाले. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले असून, शहादा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर मोहिदा गावाजवळ सात महिन्यांचे बाळ भेंडवा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. (Nandurbar Monsoon News)

या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी वाहत होते. मंगळवारी संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यात ग्रामीण भागात शेतांमध्ये साचलेले पाणी बांध फोडून बाहेर पडले. शहादा शहराच्या मध्यभागातून गेलेली पाटचारी ओसंडून वाहत होती.

शिवाय नवीन वसाहतींमध्येदेखील पाणी शिरल्याने त्या जलमय झाल्या. डोंगरगाव-दोंडाईचा रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. पटेल रेसिडेन्सीसमोर कमालीचे पाणी साचले होते. गांधी पुतळा, चार रस्ता, बसस्थानक, बांधकाम विभाग कर्मचारी वसाहत, शासकीय विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, पंचायत समिती आवार, क्रीडासंकुल.

गांधीनगर, बोहरी कॉलनी, संभाजीनगर, मीरानगर, शिरूड चार रस्ता या भागात पूर्णतः पाणी साचलेले होते. नवीन वसाहतीमधील रस्त्यांवर पाणी वाहत होते. नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नवीन वसाहतीतील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाला लागून बनविलेल्या गटारीला ठिकठिकाणी छिद्रे पाडून पाण्याच्या निचरा करण्याच्या प्रयत्न केला. (latest marathi news)

Water entering the State Bank premises in Shahada city
Nandurbar News : अखेर चोवीस तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत; वीज वितरण अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांचे प्रयत्न

न्यायालयात पाणी

डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात पाटाचे पाणी शिरल्याने पालिका प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. रात्रीच कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र दुसऱ्या दिवशीदेखील सकाळपर्यंत आवारात पाणी होते. नितीननगर, तुलसीनगर, दादावाडी परिसर, रामदेवबाबानगर परिसर पाण्याने तुडुंब भरलेला होता.

नितीननगर भागात काही घरांमध्ये पाणी शिरले. बुधवारी (ता. १७ ) आषाढी एकादशीनिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुटी होती. मात्र खासगी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच फजिती झाली. नवीन पीपल बँक इमारतीकडून पाण्याचा मोठा लोंढा रात्रभर वाहत होता. दोंडाईचा रस्त्यावर वाहतूक विस्कळित झालेली होती.

अधिकाऱ्यांचा भेटी....

तहसीलदार दीपक गिरासे, शहादा पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नवीन वसाहतीमधील पाणी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Water entering the State Bank premises in Shahada city
Nandurbar News : शहादा-तळोदा मतदारसंघासाठी 91 कोटींचा निधी : आमदार राजेश पाडवी

नद्या-नाल्यांना पूर

शहादा तालुक्यात व सातपुडा पर्वतरांगेत सर्वदूर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने गोमाई, सुसरी, वाकी व कन्हेरी नद्यांनादेखील पूर आल्याने जोरदार पाऊस झाल्याने जवळजवळ पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.

बाळ पुरात वाहून गेले

मनोज विजय ठाकरे (रा. भुलाणे, ता. शहादा) पत्नी मंजू ठाकरे यांच्यासह सात महिन्यांच्या बाळाला घेऊन मोटारसायकलने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावाकडे निघाले होते. त्या वेळी मोहिदा गावाजवळ भेंडवा नाल्याला पूर आला होता. मात्र दोन जणांनी मोटारसायकली काढल्या हे पाहून त्यानेदेखील मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक पुराच्या पाण्यात वाढ झाली.

Water entering the State Bank premises in Shahada city
Nandurbar: नर्मदा नदीकाठावरील दोन्ही तरंगते दवाखाने आजारी! वॉटर ॲम्ब्युलन्स 6 महिने बंद; अनेक गावे आरोग्य सुविधेपासून वंचित

ते पुराच्या पाण्यात वाहून जात असताना तहसील कार्यालयाच्या गुदामाच्या वॉचमनने त्या दोघांना वाचविले पण त्यांचे सात महिन्यांचे बाळ पुरात वाहून गेले. सकाळी मोहिदा गावाजवळ काही अंतरावर त्यात सात महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला. अद्याप त्या बाळाचे नाव ठेवण्यात आले नसून टोपणनाव सोन्या असल्याचे सांगण्यात आले. शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शहादा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

"शहादा तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मोहिदा गावाजवळील नाल्यात सात महिन्यांचे बाळ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती शासनाकडे कळविली आहे. वैजाली ते नांदर्डेदरम्यान सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने मंडळ अधिकाऱ्यांसह कर्मचारी पाठवून चारी करून पाण्याच्या निचरा केला असून, बांधकाम विभागाला त्वरित कळविलेले आहे. सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना माहिती घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत." - दीपक गिरासे, तहसीलदार, शहादा

Water entering the State Bank premises in Shahada city
Nandurbar News : वृक्ष लागवड संवर्धन करा घर-पाणीपट्टीत सूट मिळवा; ग्रामपंचायतीकडून अनोखा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()