पोलिस विभागाची नोकरी सोडून प्रथमच थेट राजकारणात प्रवेश करत गेल्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदार राजेश पाडवी पुन्हा तयारीला लागले आहेत. दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.
भाजपतर्फे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी काँगेसतर्फे देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी आदी इच्छुक असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे अद्याप निश्चित नाही.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली होती. (Shahada taloda Assembly Rajesh Padavi again from BJP)