तळोदा : सातपुड्याचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांच्या खरेदीसाठी तळोद्यात खवय्यांसह व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. त्यातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना एक-दीड महिन्यांसाठी का होईना पण रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र सीताफळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे उद्योग या भागात आले तर त्यातून स्थानिक आदिवासींना बाराही महिने उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो.
यासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांनी घोषणाही केल्या, मात्र त्या हवेतच विरल्या आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याविषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे सीताफळ उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (sitafal processing industry Announcement Only)