Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमधील मनरेगा कामाची जनसुनावणी नुकतीच झाली. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण सोसायटीमार्फत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ग्रामपंचायत व तहसील यंत्रणेद्वारा केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया २०२२-२३ या आर्थिक वर्षातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेला कामाची ८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर ‘नरेगा’अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल ऑडिट’ करण्यात आले. (Nandurbar Social Audit under nrega in Akkalkuwa Tehsil)
यात लेखापरीक्षण/दस्तऐवज तपासणी, १०० टक्के जॉबकार्ड तपासणी, बँक पासबुक तपासणी, सर्व मग्रारोहयो कामांची स्थळभेट, मोजमाप करणे, सुरू असलेल्या कामांना भेट, मजूरगट चर्चा भेट, एमआयएसवरील माहितीची तुलनात्मक तपासणी, सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते.
वृक्षलागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्षलागवड, तुतीलागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे. कामांची पाहणी करून जनजागृती करण्यात आली असून, प्रक्रियेदरम्यान आलेल्या मुद्द्यांचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले. काही मुद्दे तालुकास्तरावर जनसुनावणीसाठी पुढे ठेवण्यात आले.
तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींची जनसुनावणी २८ फेब्रुवारीला तहसील कार्यालयातील सभागृहात जिल्हा तक्रार निवारण अधिकारी तथा जनसुनावणी पॅनल अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण अधिकारी डॉ. कुंडलिक गवते, संस्था प्रतिनिधी अविनाश माळी, पत्रकार प्रतिनिधी मधुकर कापुरे.
विधी प्रतिनिधी ॲड. गोसावी, जिल्हा साधन व्यक्ती संजय पाटील, नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, गटविकास अधिकारी विजय लोंढे, सहाय्यक गटविकास अधिकारी वाय. डी. पवार, नरेगा कार्यक्रम समन्वयक जगदीश नाईक, मनोज पाडवी व त्यांचे सहकारी तसेच अक्कलकुवा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवक, मजूर प्रतिनिधी पद्मा पाडवी. (latest marathi news)
तक्रारदार, सरपंच तसेच इतर प्रतिनिधी, यंत्रणास्तरावरील तालुका कृषी अधिकारी, आरएफओ वन प्रादेशिक यांचे अधिकारी, कृषी सहाय्यक, सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील ग्रामसाधन व्यक्ती, समूहसाधन व्यक्ती, तालुका साधन व्यक्ती आदी उपस्थित होते. जनसुनावणी शांततेत पार पडली.
दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्याची ग्वाही
काही मुद्दे पुढील पडताळणीकरिता सामाजिक अंकेक्षण सोसायटी मुंबई येथे पाठविण्यात आले. रोजगार सेवक, नरेगा योजना संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जनसुनावणीत पारदर्शक पद्धतीने सर्व पुरावे मांडण्यात आले.
जनसुनावणीसोबत नरेगा योजना व कायद्याबाबतीत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई येथे ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू असल्यामुळे ग्रामसेवक उपस्थित राहू शकले नाहीत तरी यापुढे सर्व दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्याची ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.