Nandurbar News: जिल्ह्यात 2 लाख 95 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन! 23 हजार हेक्टरवर पीक पेरणी; शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

Nandurbar News : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा या तालुक्यांत सर्वाधिक बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकरी सर्वाधिक कपाशी लागवड करीत असतात
Women laborers while planting cotton in Akrale Shiwar
Women laborers while planting cotton in Akrale Shiwaresakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात यंदा कृषी विभागाकडून दोन लाख ९४ हजार २६३ हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी खरिपासाठी शेतीची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. काही भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस वगळता शेतकऱ्यांना आता खरीप पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा लागली आहे. तरीही मे महिन्यातील कापूस व मका लागवड सुमारे २३ हजार हेक्टरवर पूर्ण झाली आहे. (nandurbar Sowing planned on 2 lakh 95 thousand hectares in district)

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा या तालुक्यांत सर्वाधिक बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकरी सर्वाधिक कपाशी लागवड करीत असतात. एकूण कपाशी क्षेत्रापैकी या तीन तालुक्यांचा वाटा ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असतो. धडगाव व अक्कलकुवा हे दोन तालुके, तर नवापूर काहीअंशी कोरडवाहू शेतीचा तालुका आहे.

त्यामुळे या तालुक्यांमध्ये एकच अर्थात पावसाळी पिकेच घेतली जात असतात. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात उतारावरील शेती असून, तेथे मका, उडीद, मूग, तूर यांचे क्षेत्र अधिक असते. यंदाही या चार पिकांवर अधिक भर राहणार आहे.

एक लाख २१ हजार ७७८ हेक्टरवर कपाशी

जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून बागायती कापूस लागवड करीत असतात. यंदा मात्र दुष्काळी स्थिती आणि तापमानाचा पारा जास्त असल्याने कपाशी लागवडीला उशिरा सुरवात झाली. कापसाचे क्षेत्र यंदाही सर्वाधिक जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १२ मिलिमीटर पाऊस

पावसाळा सुरू झाला आहे. मात्र पाऊस सुरू झालेला नाही. काही भागांत पहिला पाऊस झाला. त्याचा विचार केल्यास नंदुरबार तालुका ९.४, शहादा १७.३, नवापूर १२.१, अक्कलकुवा ७.३, तळोदा ८.२, तर धडगाव १४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रासायनिक खतांचे नियोजन

जिल्ह्यासाठी ९७ हजार टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर आहे. त्यांपैकी ६५ हजार टन आवंटन उपलब्ध झाले आहे. यूरियाचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे जिल्ह्यासाठी ४१ टन आवंटन मंजूर झाले आहे. त्यांपैकी ३४ टन उपलब्ध झाले आहे. (latest marathi news)

Women laborers while planting cotton in Akrale Shiwar
Nashik News: पूर्व भागातील रस्त्यांची चाळण; वळविलेल्या अतिरिक्त वाहतुकीने खड्डेच खड्डे

पीकनिहाय सरासरी उद्दिष्ट (हेक्टर) असे :

पीक - उद्दिष्ट - प्रत्यक्ष पेरणी

भात - २४,०७०

ज्वारी - २७,५२७

बाजरी - ३,५७१

नाचणी- ४८

मका- ३४,०४५

इतर तृणधान्ये - ५,५०२

एकूण तृणधान्य- ९४,७६३

तूर- १२,३०३

मूग- ५,८८०

उडीद- ८,९५२

इतक कडधान्य- ५७३

एकूण कडधान्य- २७,७०८

एकूण अन्नधान्य- १,२२,४७१

भुईमूग - २६५९

तीळ - ८५

करडई - २८

सूर्यफूल - १०८

सोयाबीन - २५,९९३

इतर गळीतधान्य- ५६४

एकूण गळीत धान्य- २९,४३७

कापूस- १,२१,७७८

आजअखेर प्रत्यक्ष लागवड क्षेत्र

कापूस ९,३५४ हेक्टर

मका २९ हेक्टर

ऊसलागवड २०,५७७

जिल्ह्यात खरिपातील पिकांसोबतच बागायतदार शेतकऱ्यांकडून पपई व केळी लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मागील काही वर्षांत पपई लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र पपईचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सरासरी सहा ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकरी पपई लागवडीकडे वळले आहेत. तसेच केळीचीही लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.

केळी-पपई लागवड क्षेत्र

जिल्ह्यात रायखेड, ब्राह्मणपुरी (ता. शहादा), तळोदा, नंदुरबार परिसरात केळीची व पपईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही पिके उत्तर प्रदेशातील व्यापारी बांधावर येऊन बाग खरेदी करतात..

Women laborers while planting cotton in Akrale Shiwar
Dhule News : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण! साक्री तालुक्यातील स्थिती; आतातरी आश्वासनपूर्तीची नागरिकांची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.