Nandurbar SSC Result: नंदुरबार जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.39 टक्के! नवापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल, मुलींची टक्केवारीही अव्वल

Nandurbar News : जिल्ह्यात नवापूर बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही अव्वल ठरला आहे.
SSC Result
SSC Resultesakal
Updated on

Nandurbar SSC Result : इयत्ता दहावीच्या परीक्षेचा सोमवारी (ता. २७) ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्ह्याचा ९५.३९ टक्के निकाल लागला. नाशिक विभाग निकालात नंदुरबार जिल्ह्य दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात नवापूर बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही अव्वल ठरला आहे. (Nandurbar SSC district 10th result 95 percent)

जिल्ह्यात दहावीसाठी २० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील आठ हजार ७९३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, सात हजार ८४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, दोन हजार ४२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर २५१ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

खासगी विद्यार्थ्यांचा ९८.४३ टक्के निकाल

नंदुरबार जिल्ह्यात ६५ खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील सहा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर तीन विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

पुनर्परीक्षार्थीचा ६५.८६ टक्के निकाल

जिल्ह्यात १६८ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत, दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १०३ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.

अक्कलकुवा तालुका

तालुक्यात दोन हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार ७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी दोन हजार ५६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात एक हजार २८७ विद्यार्थी व एक हजार २७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्याचा निकाल ९४.१६ टक्के लागला.

SSC Result
Jalgaon SSC Result: दहावीच्या परीक्षेतही मुलीच आघाडीवर! नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी; 94.88 टक्के निकाल

धडगाव तालुका

तालुक्यात एक हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ४३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ६४२ विद्यार्थी व ६९९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. धडगाव तालुक्याचा निकाल ९३.५७ टक्के लागला.

नंदुरबार तालुका

तालुक्यात पाच हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ५८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच हजार ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात दोन हजार ८१२ विद्यार्थी व दोन हजार ५४३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्याचा निकाल ९५.९६ टक्के लागला.

नवापूर तालुका अव्वल

तालुक्यात तीन हजार ८१० विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार ६८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी तीन हजार ५९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात एक हजार ८७७ विद्यार्थी व एक हजार ७१८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नवापूर तालुक्याचा निकाल ९७.६३ टक्के लागला.

शहादा तालुका

तालुक्यात पाच हजार ९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी चार हजार ६९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात दोन हजार ४७० विद्यार्थी व दोन हजार २२० विद्यार्थिनींचा समावेश आहे. शहादा तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के लागला.

तळोदा तालुका

तालुक्यात एक हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ९२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ८९६ विद्यार्थी व ८६७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तळोदा तालुक्याचा निकाल ९१.३९ टक्के लागला. (latest marathi news)

SSC Result
Jalgaon SSC Exam Result : पारोळा तालुक्यात दहावीचा 95 टक्के निकाल

मुली टक्केवारीत अव्वल

नंदुरबार जिल्ह्यात एकूण २० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नऊ हजार ९८४ विद्यार्थी व नऊ हजार ९२५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. जिल्ह्यात ९४.३० टक्के विद्यार्थी व ९६.५८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.

दुःखाचा डोंगर पेलत अंजलीने मिळविले यश

नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनी अंजली मधुकर नाईक ही इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ती ग्रामीण भागातील अमलीबारी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथे राहणारी असून, घरची परिस्थिती अत्यंत साधारण आहे. अशा परिस्थितीत बोर्डाचे पेपर सुरू असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.

वडिलांचे अंत्यसंस्कार करून, गावाहून नंदुरबारपर्यंत प्रवास करून पेपराकरिता उपस्थित राहिली. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तिने ७० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. वडिलांना खरी श्रद्धांजली वाहिली असून, तिचे शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अंजलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

SSC Result
Dhule SSC Exam Result : दहावीतील मॅचमध्ये चौघे सामनावीर! जिल्ह्याचा दहावीचा निकाल 94.31 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.