बोरद : येथील जुल्फेकार तेली व तुळाजा (ता. तळोदा) येथील सागर पवार यांच्या कुक्कुटपालन केंद्रा3तील साधारणतः दोन हजार ७०० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यामुळे दोन्ही कुक्कुटपालन केंद्रे चालविणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. (Nandurbar Summer 4 thousand chickens died due to heat stroke Poultry center manager of Borad Tulaja hit marathi news)
येथील जुल्फेकार तेली २०१४ पासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत आहेत. यामधून मिळणारे उत्पन्न तसेच शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचप्रमाणे तुळाजा येथील सागर दिवाकर पवार यांनीदेखील कुक्कुटपालनाचा व्यवसाय काही वर्षांपूर्वी आपल्या गावी सुरू केला आहे. व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडे पाच हजार कोंबड्यांची बॅच होती. हळूहळू त्यांची संख्या वाढली. ती संख्या आता साधारणतः दहा हजारांपर्यंत पोचली होती. आपला व्यवसाय ते सुनियोजितपणे चालवीत होते.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमध्ये भरमसाट वाढ झाल्यामुळे बोरद येथील जुल्फेकार तेली यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील एक हजार २०० कोंबड्यांचा उष्णतेमुळे बळी गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग कोंबड्या मरत असल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
त्याचप्रमाणे तुळाजा (ता. तळोदा) येथील सागर दिवाकर पवार यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील दोन ते तीन हजार कोंबड्यांचा तापमानवाढीमुळे बळी गेल्याचे सागर पवार यांनी सांगितले. अचानक वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्यांचा रोजच बळी जात असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. (latest marathi news)
वास्तविक कोंबड्या जातीप्रमाणे तसेच त्यांच्या आरोग्याप्रमाणे तापमानाचा सामना करत असतात. त्या ३५ ते ४० डिग्री तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात; परंतु तापमान ४२ ते ४३ पर्यंत गेल्यास कोंबड्यांना ते तापमान सहन होत नाही म्हणून ते वाढत्या तापमानाचा बळी ठरतात. उष्णता कमी करण्यासाठी कोंबड्या आपल्या डोळ्यांची उघडझाप करताना आढळून येतात.
सतत डोळ्यांची उघडझाप केल्यामुळे त्यांच्या श्वसनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर उष्णतेपासून वाचण्यासाठी कोंबड्या पाणी तोंडाजवळ आणत असतात आणि सतत पाणी तोंडाजवळ ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होऊन त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि त्या उष्णतेच्या बळी ठरतात.
"गेल्या तीन दिवसांपासून माझ्या कुक्कुटपालन केंद्रावरील पाच हजार कोंबड्यांपैकी १२०० ते २००० कोंबड्यांचा बळी गेल्यामुळे माझे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर माझे सहकारी सागर पवार मिळून आम्ही सोबतच हा व्यवसाय सुरू केला. सागर पवार यांच्याही कुक्कुटपालन केंद्रातील २००० ते २७०० कोंबड्यांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी."
-जुल्फेकार तेली, कुक्कुटपालन व्यावसायिक, बोरद (ता. तळोदा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.