Nandurbar Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेमुळे थंडपेयाला पसंती; बोरद परिसरात विक्रीत मोठी वाढ

Summer Heat : बोरद परिसरात उन्हाच्या तीव्रतेने कळस गाठल्यामुळे बाजारनिमित्त आलेल्या नागरिकांचा ओढा थंड पेयाकडे वळाल्याचे सध्या चित्र आहे.
Crowd of citizens in liquor shop here.
Crowd of citizens in liquor shop here.esakal
Updated on

Nandurbar Summer Heat : बोरद परिसरात उन्हाच्या तीव्रतेने कळस गाठल्यामुळे बाजारनिमित्त आलेल्या नागरिकांचा ओढा थंड पेयाकडे वळाल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाची तीव्र लाट सर्वत्र असल्याने या परिसरातही नागरिकांना उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने शीतपेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडण्याला नापसंती दर्शवित आहेत. (Nandurbar Summer Heat Cold drink is preferred due to heat of sun in borad marathi news )

कसेतरी बाजारात दुपारी १२ पर्यंतच नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. मात्र, त्यानंतर शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे. अशाही परिस्थितीत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने यापासून तात्पुरती का असेना सुटका मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी शितपेयाच्या दुकानाकडे वळत आहे.

बोरद येथे परप्रांतीय व्यावसायिकांनीही लस्सी व आईस्क्रीमची दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर इतर छोट्यामोठ्या १० ते १५ लिंबू, सोडा तसेच शीतपेय विक्रीची दुकाने आहेत. तसेच, शिकंजी विक्रेतेही आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आमचा व्यवसाय मध्यम गतीने चालू होता. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने व्यवसायात तेजी आली आहे.

नामांकित कंपनीच्या पेयांच्या तुलनेत ग्राहक लस्सी, लिंबू शरबत व शिकंजीसारख्या देशी थंड पेयाला अधिक पसंती देत आहे. त्याचबरोबर काही ग्राहक स्थानिक बाटलीबंद पेयाला अधिक महत्त्व देत आहे. थंड पेयांबरोबर बाटलीबंद पाण्याची विक्री देखील वाढली आहे. (latest marathi news)

Crowd of citizens in liquor shop here.
Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

''गेल्या काही दिवसांपासून थंड पेयामध्ये लिंबू सरबत तसेच, लस्सी व ताकाची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक आपले तहान भागविण्यासाठी थंड पेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे साहजिकच आमच्या दुकानातील पेयांना मोठी मागणी वाढली आहे.''- विनोद पाटील, शितपेय विक्रेते, बोरद

थंड पेयाचे दर

लिंबू शरबत : १० ते १५ रुपये

ताक : १० रुपये

शिकंजी : १५ रुपये

लिंबू सोडा : १५ रुपये

स्थानिक बाटलीबंद पेय : १० ते १५ रुपये

नामांकित कंपनीचे पेय : २०० मिली १५ रुपये

Crowd of citizens in liquor shop here.
Nandurbar Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच लिंबू शिकंजीच्या हातगाड्यांवर गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.