Nandurbar Summer Heat : तळोद्यात पारा चढला! 42 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानामुळे अंगाची लाहीलाही

Summer Heat : तळोदा शहरासह तालुक्यात सध्या सर्वत्र तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे.
Summer Heat
Summer Heatesakal
Updated on

Nandurbar Summer Heat : तळोदा शहरासह तालुक्यात सध्या सर्वत्र तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, तापमान ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त राहत असल्याने आबालवृद्धांचा अंगाची चांगलीच लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर व घरामध्ये अति उष्णतेच्या संपर्कामुळे हीट स्ट्रेस निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे उष्माघाताशी संबंधित आजारदेखील होऊ शकतात. सर्वांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांमधून सांगण्यात येत आहे. ( present temperature has risen in taluka including Taloda city)

मे महिन्याला सुरवात झाली असून, त्याचबरोबर उन्हाची तीव्रतादेखील वाढली आहे. सकाळी नऊपासून उन्हाची तीव्रता जाणवायला सुरवात होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्म्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेक जण दुपारी घराबाहेर पडणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातील जनजीवनदेखील विस्कळित होत आहे.

कडक उन्हापासून बचावासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे, सुती, सैल आणि आरामदायी कपडे घालणे, भरपूर ताजे अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडणे, उन्हात बाहेर जाताना डोके झाकणे, छत्रीचा वापर करणे, वारंवार पाणी-ताक पिणे, ओआरएस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबूपाणी, आंबा पन्हे आदी घरगुती पेय पिण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर रिकाम्यापोटी उन्हात बाहेर पडू नये, उन्हात अधिक वेळ राहू नये, तिखट मसालेदार खाऊ नये, नेहमी पाणी सोबत ठेवावे, शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये, ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवणे, कूलर किंवा एअर कंडिशनमधून थेट उन्हात बाहेर पडू नये ही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांमधून सांगण्यात येत आहे. (latest marathi news)

Summer Heat
Nashik Summer Heat News : पाऱ्यात दोन अंशांची घसरण, कमाल तापमान 39.4 अंश

सध्या बहुतांश शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या असून, त्यांच्याकडून भरउन्हात मैदानी खेळ खेळण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना उन्हापासून संरक्षणबाबत जागृत करणे गरजेचे असून, वरिष्ठांनी त्यांना समज देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच मैदानावर चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार सध्या आढळून येऊ लागले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून उष्माघाताची लक्षणे आढळलेल्या व्यक्तीस तत्काळ झाडाच्या सावलीच्या ठिकाणी झोपविणे, व्यक्तीचे कपडे सेल करणे, त्याला द्रवपदार्थ, कैरीचे पन्हे पाजणे, तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे तसेच संबंधित व्यक्तीला तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन उपचार सुरू करणे ही कामे करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

उष्माघाताची लक्षणे

-प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइटपर्यंत पोचणे

-तीव्र डोकेदुखी, स्नायूंचे अखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे.

-लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे, चिडचिड करणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाची त्वचा कोरडी होणे.

जेवणावळी लवकर उरकण्यात यावी

सध्या लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असून, उन्हाची तीव्रता बघता अशा कार्यक्रमांमध्ये जेवणावळी लवकर सुरू करून देण्यात यावी, असे बोलले जात आहे, जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी जाणवेल. तसेच शिजविलेल्या अन्नात कडक तापमानामुळे काही दुष्परिणाम होऊन विषबाधा होऊ शकते. यासाठी वेळीच खबरदारी घेऊन जेवणे लवकर सुरू व्हावीत, असेही बोलले जात आहे.

Summer Heat
Nandurbar Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेमुळे थंडपेयाला पसंती; बोरद परिसरात विक्रीत मोठी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.