Nandurbar Teacher Constituency Election : शिक्षकांनी ॲड. संदीप गुळवे यांच्या पाठीशी राहा : खासदार गोवाल पाडवी

Teacher Constituency Election : शिक्षकांच्या विविध प्रश्नांना अनेक वर्षांपासून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या एक उमद्या लोकप्रतिनिधीची उणीव नाशिक विभागात आहे.
MP Gowaal Padavi
MP Gowaal Padaviesakal
Updated on

Nandurbar Teacher Constituency Election : शिक्षकांच्या विविध प्रश्नांना अनेक वर्षांपासून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या एक उमद्या लोकप्रतिनिधीची उणीव नाशिक विभागात आहे. महाविकास आघाडीने ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी देत ती भरून काढल्याने खऱ्या अर्थाने शिक्षक एक उच्चशिक्षित उमेदवारास मोठ्या संख्येत प्रथम पसंती देऊन विधान परिषदेत पाठवतील, असा विश्वास नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला. (MP Gowaal Padavi statement of Teachers Stand by Sandeep Gulve)

महाविकास व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप गुळवे यांनी नंदुरबार, धुळे, जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिक्षक मतदारांच्या भेटी घेत पुढील व्हीजनबाबत भूमिका स्पष्ट केली. नवापूर, अक्कलकुवा, साक्री, शहादा, शिरपूर, तळोद्यासह विविध ठिकाणच्या संस्थाचालक व शिक्षकांच्या बैठका घेत यंदा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्यातील ज्ञानदानाला परमोच्च स्थान देण्यासाठी गुळवेंना विजयी करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले.

अरुण चौधरी, पंडित माळी, महायुती सेना अध्यक्ष मालती वळवी, महिला जिल्हा संघटक रीना पाडवी, दीपक गवते, युवा सेनेचे अर्जुन मराठे उपस्थित होते. धुळ्यात शिवसेना भवन येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रा. शरद पाटील, हिलाल माळी, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, डॉ. सुशांत महाजन, डॉ. शुभांगी वानखेडे, श्री. साळुंके, प्रा. ठाकरे, प्रा. मासुळे, श्री. वाणी, बापू पवार, बी. डी. पाटील, हर्शल मोरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर सहभागी झाले होते. (latest marathi news)

MP Gowaal Padavi
Nashik Teacher Constituency Election : दराडे- ॲड. गुळवे- कोल्हे यांच्यात रंगणार तिरंगी सामना

‘समान काम समान वेतन सर्वांना हवी एकच पेन्शन’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने ॲड. संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला. निवडणूक राज्य प्रभारी गीता वितेश खांडेकर, सहप्रभारी नामदेव मेटांगे, राजश्री उगले यांनी गुळवेंना पाठिंब्याचे पत्र दिले. गुळवे यांनी पेन्शन प्रश्न सर्वतोपरीने सोडविण्याचे वचन दिल्याने त्यांना नाशिक विभागात पाठिंबा जाहीर करत असल्याचे उपस्थित पदाधिकाखऱ्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना, कलाध्यापक संघ अशा शिक्षण क्षेत्रांतील विविध संघटनांमार्फत ॲड. गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला. १६ ते १८ जून २०२४ या कालावधीत नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी (धडगाव), अक्कलकुवा, नवापूर तालुक्यात शाळांच्या भेटी, मेळावे तसेच संस्थाप्रमुख यांच्या ॲड. गुळवे व संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दौरा झाला.

''संदीप गुळवे कार्यक्षम, अभ्यासू व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन पातळीवर प्रलंबित आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी संदीप गुळवे हेच सक्षम उमेदवार असल्याने सर्वच शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. यंदा नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील शिक्षक मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता गुळवे यांना प्रथम पसंती देऊन विजयी करतील, असा विश्वास आहे.''- प्रा. डॉ. एन. डी. नांद्रे सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)

MP Gowaal Padavi
Teacher Constituency Election : संदीप गुळवे यांना ‘मविआ’कडून अधिकृत उमेदवारी; शिक्षक मतदारसंघ निवडणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.