Nandurbar News : पट वाचविण्यासाठी शिक्षकांची कसरत! रक्तदाब, शुगरच्या औषधे घेत फिरतायत गावोगावी

Nandurbar News : खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेला वेग देत आहेत.
Teachers with students
Teachers with studentsesakal
Updated on

प्रशांत मराठे : सकाळ वृत्तसेवा

खापर : शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी झाला आहे. पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे. खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेला वेग देत आहेत. (Teachers travel to village ro increase admission marathi news)

संस्थेतर्फे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेकांनी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मोफत, घरून शाळेपर्यंत व शाळेतून घरापर्यंत पोचविण्यासाठी सेवाही पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय अन्य आकर्षक प्रलोभने दिली जात आहेत. अनेकांची ऑफर स्वीकारून विद्यार्थी इकडल्या शाळेतून तिकडे असा प्रकारही पाहायला मिळत आहे. यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांच्या नामवंत शाळांकडे रांगा लागत आहेत, तर अन्य शाळांना मात्र विद्यार्थ्यांसाठी वणवण फिरावे लागत आहे.

विद्यार्थ्यांची गणपूर्ती करण्यासाठी अनेक शिक्षक तर स्वखर्चातून विद्यार्थ्यांना प्रलोभन देत आहेत. मराठी शाळांची विद्यार्थिसंख्या दर वर्षी कमी होत असल्याने शाळा टिकविणे हे उद्दिष्ट संस्थांचे आहे. त्याचा अंतिम परिणाम शिक्षकांवर होत असल्याने आणि नोकरी तेथेच टिकावी या अपेक्षेने विद्यार्थी शोधमोहीम सुरू आहे. अनेकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले असले तरी काही शाळांत अद्यापही विद्यार्थ्यांची वानवाच दिसत आहे. उत्पन्न कमी असलेल्या पालकांचा गटही आता इंग्रजी मीडियमकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत.

मराठी वाचवा दिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थिसंख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्याही घटतच आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना विद्यार्थिसंख्या कमी आहे. शिक्षकांची कमतरता, इमारत आणि संसाधनांची कमी यामुळेच अधिकाधिक शाळा समस्येच्या गर्तेत सापडल्या आहेत. खासगी शिक्षणसंस्थांची तत्परता आणि गतिशील नियोजन यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी त्या शाळांकडे वळत आहेत. परिणामी, ग्रामीण शाळांत विद्यार्थिसंख्या रोडावली हे वास्तव आहे. (latest marathi news)

Teachers with students
Dhule: पेपर तपासणीत गलथान कारभार कायम! युवासेनेसह विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यापीठावर मोर्चा, कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन

खासगी शाळांनाही पुरेशी विद्यार्थिसंख्या मिळत नसल्याने नामवंत नसलेल्या शाळांतील वर्ग तुटत असून, अतिरिक्त शिक्षक या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हाच वेग कायम राहिल्यास मराठी शाळा बंद झाल्यास नवल नसावे. शासनाचे धोरण नेमके कुठल्या दिशेने जाते, हे स्पष्टच होत नसून मराठी वाचेल काय, मराठी भाषा, मराठी संस्कृतीची वाढ खुंटणार की काय, अशी ओरड होताना दिसून येत आहे.

मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात

दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय, मराठीचे भवितव्य काय, असा प्रश्न उभा ठाकतोय. मराठीची वानवा आपल्या मराठी राज्यात जाणवत असली तरी विदेशात मात्र मराठी भाषेचे आकर्षण वाढत आहे. या विरोधाभासाचे विचित्र चित्र उमटत असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.

संस्थांचा शिक्षकांना प्रवेशासाठी तगादा वाढतच आहे. नामवंत शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही पालकांचीही धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे नोकरी आहे त्या ठिकाणी टिकण्यासाठी रक्तदाब व शुगर असलेल्या अनेक शिक्षकांना गोळ्या खात परिश्रम घ्यावे लागत आहेत, तर इंग्लिश मीडियम शाळांची ‘बिना मांगे मोती मिले’ अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

Teachers with students
SAKAL Exclusive: सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या शहादा बसस्थानकाची अवस्था! पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.