Nandurbar Summer Heat : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी; उन्हाचा तीव्रेतेत वाढ, उकाडाने नागरिक हैराण

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे येथे दुपारी बारानंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
Temperature
Temperature esakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे येथे दुपारी बारानंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने नागरीक हैराण झाले आहेत. सध्या एकीकडे अधूनमधून बेमोसमी पावसाचे वातावरण तयार होतानाच उन्हाचा पारा मात्र वाढतच आहे. (Nandurbar Temperature crossed forty in district)

३५ अशांवरून थेट चाळीस अंश सेल्सिअस पार करीत उन्हाच्या तीव्रतेने हैराण केले आहे. सध्या उन्हाचा तीव्रतेमुळे शेतकरी पपई पिकाची लागवड करताना मागेपुढे करीत आहेत. अतिउष्णतेत पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शेतकरी पारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी मात्र लागवड उशिरा होऊ नये म्हणून पपईची लागवड करीत आहेत.

रस्ते, बाजारपेठ निर्मनुष्य

वाढत्या तीव्रतेमुळे शहरातील रस्ते व बाजारपेठ दुपारी निर्मनुष्य होऊ लागली आहे. तीव्र उन्हामुळे नागरिक दुपारी बारानंतर बाहेर पडणे टाळू लागले आहेत. (Latest Marathi News)

Temperature
Nandurbar Lok Sabha Constituency : छाननीअंती 16 उमेदवारी अर्ज वैध!

त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ लागला आहे. बाजारपेठ सायंकाळी पाचनंतर फुललेली दिसते. त्यामुळे व्यापारी - व्यावसायिकही आपली आस्थापने दुपारी बंद ठेवतात.

शीतपेयांना मागणी वाढली

दरम्यान, उन्हाचा तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यामुळे कामानिमित्त शहरात आलेले नागरिक शीतपेये विक्रेत्यांच्या दुकानांवर गर्दी करू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसू येत असला तरी ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेले नागरिक शीतपेये विक्रेत्यांचा दुकानांवर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे लस्सी, लिंबू शरबत, ताक, आईस्क्रीम, गुल्फी, गोला आदी शीतपेयांना मागणी वाढली आहे.

Temperature
Nandurbar Lok Sabha Constituency : डॉ. हीना गावित, चंद्रकांत रघुवंशी यांच्या भेटीचा मतितार्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.