Nandurbar Traffic Problem : मोलगीतील वाहतूक कोंडी सुटणार कधी? ग्रामस्थांची नाराजी

Nandurbar News : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील वाहतूक कोंडी तशी कायमचीच.
Vehicles parked awkwardly on the main market road.
Vehicles parked awkwardly on the main market road.esakal
Updated on

Nandurbar News : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील वाहतूक कोंडी तशी कायमचीच. ही कोंडी सुटावी म्हणून नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा केला; परंतु नागरिकांच्या या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखविली गेली. त्यामुळे ही कोंडी खरंच सुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत हातगाड्यांचे नियोजन व पार्किंगची सुविधा व्हावी, अशी अपेक्षाही केली जात आहे. (Nandurbar traffic jam at Molgi one of major markets in remote area remains constant)

मोलगी बाजारेठेत दिवसभर तिन्ही राज्यांच्या सीमेवरील नागरिकांची वर्दळ असते. त्यात जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री होते. त्यामुळे मोलगीत लोकांची मोठी गर्दी बाजारपेठत पाहायला मिळते; परंतु या वर्दळीच्या तुलनेत बाजारात वाहन पार्किंगची कुठलीही सुविधा करण्यात आलेली नाही. असे असतानाच मुख्य बाजारपेठ, अक्कलकुवा रोड व धडगाव रोड या सर्वाधिक वर्दळीच्या भागातच वाहने लावली जात आहेत.

याशिवाय मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर बहुतांश व्यापारी आपापल्या दुकानासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करीत तेथेही धंदा मांडून बसले आहेत. त्यात शेतमाल खरेदी करणाऱ्यांसह अन्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळेच मोलगीत वाहतूक कोंडी होत आहे. या सातत्यपूर्ण वाहतूक कोंडीमुळे नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत.

ही समस्या सुटावी म्हणून स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा केला; परंतु समस्या काही सुटल्याच नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या या मागणीला निश्चितच केराची टोपली दाखविण्यात आली असावी, असे म्हटले जात आहे.

Vehicles parked awkwardly on the main market road.
Dhule News : 60 किलो कांद्यासाठी 32 हजारांचा दंड..! रात्रभर वाहन थांबविले, काट्यात तफावतीचा संशय

ग्रामपंचायत ठरावाचा विसर

बाजारातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोलगी ग्रामपंचायतीने ठराव करीत पोलिस प्रशासनाला निवेदनही दिले; परंतु ठरावाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल केलाच गेला नाही. त्यामुळे या ठरावासह निवेदनाबाबत संबंधित यंत्रणेला विसर पडला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

"मोलगी ही तशी जुनी बाजारपेठ असल्याने तिला तिन्ही राज्यांच्या सीमेवरील नागरिकांकडून मोठे महत्त्व दिले जाते. सुरक्षेसाठी पोलिस ठाणेही कार्यान्वित केले; परंतु बाजारपेठेच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने येथे कुठलीच सुसूत्रता ठेवली नाही. त्यामुळे नागरिकांना समस्यांशी सामना करावा लागत आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी अक्कलकुव्याकडे जाणारी वाहने अक्कलकुवा रोड, वडफळी-पिंपळखुटाकडे जाणारी वाहने पिंपळखुटा रोडवर व धडगावच्या दिशेने जाणारी वाहने धडगाव रोडवरच पार्किंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी." -दिलीप राऊत, सरपंच, वडफळी (ता. अक्कलकुवा)

Vehicles parked awkwardly on the main market road.
Dhule News : वर्षभरानंतरही बायोगॅस प्रकल्प अपूर्णच! 12 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.