Nandurbar News : क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवाशांची वाहतूक! अक्कलकुवा तालुक्यातील जीवघेण्या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष

Nandurbar News : वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आदिवासी भागातील जनतेच्या जिवावर बेतत असल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे.
An overloaded vehicle en route from Akkalkuwa to Molgi.
An overloaded vehicle en route from Akkalkuwa to Molgi.esakal
Updated on

खापर : अक्कलकुवा तालुक्यात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीद्वारे अपघाताला थेट निमंत्रण दिले जात आहे. वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आदिवासी भागातील जनतेच्या जिवावर बेतत असल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे. (Nandurbar Transport of passengers three times more than capacity)

तालुक्यात खासगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास सुरू आहे. अनेकवेळा खासगी वाहन दरीत कोसळून तर कधी अपघात होऊन अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे शासनाने अशी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी अनेक नियम-अटी केल्या तरी पोलिस प्रशासनाने केलेल्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे परिस्थितीत अद्यापही बदल झालेला नसल्याचे बोलले जात आहे.

अक्कलकुवा तालुक्याचे अधिकांश क्षेत्र डोंगराळ आहे. त्यात दुर्गम भागात दिवसातून एकदा ये-जा करणारी एस. टी. बस प्रवासासाठी पुरेशी नसल्याने येथील प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय सोईचा ठरतो. तसेच प्रवासी वैतागून खासगी वाहतुकीकडे वळतात. बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतूकदारांचा गराडा असतो.

अवैध वाहतूकदार बसस्थानकातून प्रवासी पळवतात. प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खासगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे. अक्कलकुवा तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी कोंबून भरलेले असतात. एका रिक्षामध्ये दहापेक्षा अधिक तर इतर वाहनांमध्ये ३० ते ४० जण बसलेले असतात. (latest marathi news)

An overloaded vehicle en route from Akkalkuwa to Molgi.
Simhastha kumbh Mela : सिंहस्थ आराखड्याच्या नाना तऱ्हा! अंतिम हात फिरविताना गंभीर चुका

वाहनांची तपासणी होणार नसल्याचे चालकांना माहीत आहे, त्यामुळे नियमितपणे चिरीमिरी देऊन तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. तालुका पोलिस ठाण्यात दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पोलिस निरीक्षक नाही, प्रभारीची ये-जा सुरू असते.

प्रभारी तालुक्यात जातीने लक्ष देत नसल्यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील जनतेकडून पोलिस निरीक्षकाची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी नंदुरबार पोलिस अधीक्षक यांना अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक नेमणुकीसाठी निवेदनही दिले आहे.

बेशिस्त पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम

अक्कलकुवा, मोलगी, खापर ही बाजारपेठेची गावे आहेत, येथे कार्यालयीन व विविध कामांसाठी गावपड्यावरील लोक येतात. दरम्यान येणारी लोकं आपली वाहने दुकान व कार्यालयासमोर बेशिस्तपणे पार्किंग करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशा बेजबाबदार वाहन चालकांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

An overloaded vehicle en route from Akkalkuwa to Molgi.
Nandurbar News : 20 वर्ष सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचितच! नंदुरबार जिल्ह्याच्या गट ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची खंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.