Nandurbar News : शहरातील खानदेशी गल्लीत शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकून कनेक्शन दिले असताना चक्क दुसऱ्यांदा खोदकाम करून पाइपलाइन टाकली जात आहे. यामुळे पूर्वीच्या कनेक्शनसाठी नागरिकांनी केलेला खर्च वाया गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे सध्या हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामात आधीची पाइपलाइन उपयोगी नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे असल्याचे कळते. ( twice pipeline for pure water in taloda)
त्यामुळे दुसऱ्यांदा पाइपलाइन टाकण्याचे काम होत आहे. त्यामुळे खानदेशी गल्लीत पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन पूर्णतः कोलमडल्याची स्थिती आहे. शहरात हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेत खोदकाम करून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या या पाइपलाइनचे काम खानदेशी गल्लीत सुरू आहे. या गल्लीतील वर्ड चौक ते आवाला चौक इथपर्यंत नव्याने पाइपलाइन टाकली जात आहे.
मात्र या भागात आधीच तीन ते चार वर्षांपूर्वी नवीन पाइपलाइन टाकून नागरिकांना कनेक्शन दिले आहे. ते कनेक्शन फिल्टर पाण्याची योजना सुरू होईल त्यावेळी त्यातून पाणी येईल, असे सांगून टाकले होते. मात्र हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेत आता खोदकाम सुरू असताना नवीनच पाइप टाकला जात असल्याने आधीचे घेतलेले कनेक्शन व केलेला खर्च वाया गेला आहे.
त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आता पुन्हा नवीन पाइपलाइन वरून नवीन कनेक्शन घ्यावे लागणार आहे. पहिल्या वेळेला पाइपलाइन खोदकाम करताना कनेक्शनचा खर्च नागरिकांनी स्वतः केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र दोनदा पाइपलाइन टाकावी लागत असल्याने पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
वाऱ्यावर सोडल्याची भावना
हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेत खोदकामात अनंत त्रुटी आहेत. रस्ते तर खराब होत आहेतच त्यात कुठे खड्डे तर कुठे उंचवटे अशी परिस्थिती बनली आहे. कनेक्शन दिले असताना पुन्हा कनेक्शन घ्यावे लागणार आहे. अशी सर्व परिस्थिती असताना संपूर्ण शहरात लोकप्रतिनिधी म्हणून वॉर्डात उमेदवारी केलेल्या सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांनी नागरिकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सध्या पालिकेत दीड वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यामुळे निवडणूक केव्हा होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.