Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट करत विधानसभेचे रणशिंग फुंकले. त्यांनी भाजप प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षात राहून तिकीट न मिळण्याची जाणीव झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. राजेंद्रकुमार गावित आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. (Rajendra Kumar Gavit resign BJP)
श्री. गावित शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास गतवेळीही इच्छुक आहेत. सध्या तिथे भाजपचेच राजेश पाडवी आमदार आहेत. त्यामुळेच गावित यांनी भाजपमधील पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला धक्का बसला आहे. २०१४ मध्ये श्री. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविली.
त्यात त्यांचा जवळपास साडेअकरा हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. पण भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासही ते इच्छुक होते. पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढविण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. (latest marathi news)
गावित अन्य पक्षात गेल्यास किंवा अपक्ष लढल्यास भाजपला फटका बसू शकतो. धनगर आरक्षणाबद्दल महायुतीने घेतलेली भूमिकादेखील श्री. गावित यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. नंदुरबार आदिवासी जिल्हा असल्याने महायुतीच्या भूमिकेचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
या सगळ्या बाबी लक्षात घेता राजेंद्रकुमार गावित यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. शहादा-तळोदा मतदारसंघात राजेंद्रकुमार गावितांनी दोनच आठवड्यांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.