Nandurbar Vidhan Sabha Election 2024: लोकसभेतील एकसंघ एकमेकांसमोर उभे ठाकणार! कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात महायुती आजमावणार नशीब

Vidhan Sabha Election : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील भाजप वगळता सर्वच पक्षाचे पदाधिकारी एकसंघ झाले होते.
Vidhan sabha Election
Vidhan sabha Electionesakal
Updated on

नंदुरबार : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील भाजप वगळता सर्वच पक्षाचे पदाधिकारी एकसंघ झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डींग लावणारे हेच नेते आता एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अक्कलकुवा-अक्राणी हा विधानसभा मतदार संघ गेल्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्त्व कॉंग्रेसचे नेते ॲड. के. सी. पाडवी करतात. ( Vidhan Sabha Election Unions in Lok Sabha will face each other)

त्यांची चांगली पकड या मतदारसंघावर आहे. मागील पाच वर्षे वगळता ते निवडणुकीच्या काळातच मतदारसंघात यायचे. कधी अधून-मधून येत असत. मात्र, सर्वाधिक वेळ मुंबईतच असत. तरीही निवडणुकीत त्यांचा विजय निश्‍चित असे, एवढी विश्‍वासार्हता त्यांच्यावर मतदारांची आहे. त्यामुळे गेली ४० वर्षांपासून ते मतदारसंघात आमदार आहेत. त्यांच्याविरोधात आतापर्यंत भाजप, शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. मात्र, त्यांचा टिकाव लागला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीची परिस्थिती अत्यंत चुरशीची आहे.

या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांचे एकमेव नाव पक्षाकडे गेले आहे. पक्षात त्यांना कोणाचा विरोध नाही. मात्र, इतर पक्षाच्या उमेदवारांचे तगडे आव्हान राहील, हे निश्‍चित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारांचा आढावा घेतल्यास खरी लढत महायुती व महाविकास आघाडी अशी राहील. महाविकास आघाडीचे श्री. पाडवी हे उमेदवार असतील. तर त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार म्हणजे शिंदे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. (latest marathi news)

Vidhan sabha Election
Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : राजेंद्रकुमार गावित यांचा भाजपला अखेर रामराम! विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रणनीती

त्यामुळे या मतदारसंघाकडे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये विजय पराडके, किरसिंग वळवी हे इच्छुक उमेदवार आहेत. दोन्हीही मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले उमेदवार आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात उमेदवारी करण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. दोन्हीही जि. प. चे सदस्य आहेत. त्यांनी मतदारसंघात विकासकामांसाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहे.

त्यातून अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत के. सी. पाडवी यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळी अटीतटीची लढत झाली होती. त्यामुळे आताही अत्यंत चुरशीची लढत होईल, यात शंका नाही. त्यामुळे शिंदे शिवसेना व कॉंग्रेसमध्येच खरा सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तरीही या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते रतन पाडवी हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, महायुतीत ही जागा त्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही ते शेवटपर्यंत आस धरून आहेत. कॉंग्रेसच्या ॲड. वळवी यांच्यासमोर पराडके की किरसिंग वळवी हे मात्र प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होईल, तेव्हाच स्पष्ट होईल.

हातमिळवणी केलेले आता विरोधात

लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेना ही महायुतीचा घटक असला तरी त्यांचा भाजपने दिलेल्या उमेदवाराला विरोध होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला विरोध म्हणून विरोधी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणजेच आमदार के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना निवडून आणण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे विरोधकांशी हात मिळवणी करीत महायुतीचा धर्म न पाळता विरोधात काम केले. म्हणजे लोकसभेत आमदार वळवी व शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत तेच एकत्र असलेले नेते एकमेकांसमोर उमेदवारी करणार असल्याचे चित्र आहे.

Vidhan sabha Election
Nandurbar Lok Sabha Election : वाढलेले मतदान कुणाच्या फायद्याचे? मतदानानंतर आकडेमोड, चर्चांना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.