Nandurbar News : नवापूर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा! कमीत कमी शंभर मिलिमीटर पावसाच्या नोंदीनंतरच पेरणीचे आवाहन

Nandurbar News : सुरवातीला कमीत कमी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद होऊ द्या मगच पेरणीला सुरवात करा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
Agricultural assistant demonstrating soybean germination test.
Agricultural assistant demonstrating soybean germination test.esakal
Updated on

नवापूर : नवापूर तालुक्यात खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या कृषी सहाय्यकांमार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीला सुरवात करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती पावसाची. सुरवातीला कमीत कमी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद होऊ द्या मगच पेरणीला सुरवात करा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. (Nandurbar Waiting for rain in Nawapur Taluka)

खरीप हंगामाचे नियोजन

नवापूर तालुक्यात खरिपाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९१ हजार ३८३.३८ हेक्टर असून, त्यांपैकी लागवडीलायक क्षेत्र ६० हजार ५९३ हेक्टर व वहितीयुक्त क्षेत्र ५५ हजार ४५ हेक्टर आहे. या खरीप हंगामासाठी ५५ हजार ४५ हेक्टर क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे.

मागील वर्षी खरीप हंगामाचे नियोजन व फलित

गेल्या खरिपाच्या हंगामात ५४ हजार ३८०.६० हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. त्यात प्रमुख पिके उत्पादन भात एक हजार ५६.६५ किलो प्रतिहेक्टर, खरीप ज्वारी एक हजार ३.४ किलो प्रतिहेक्टर, मका एक हजार ४८२ किलो प्रतिहेक्टर, तूर ३३८.४७ किलो प्रतिहेक्टर सोयाबीन १३३.५० किलो प्रतिहेक्टर, कापूस २५१.८३ किलो प्रतिहेक्टर असे आले होते.

कृषी विभागाकडून बियाणे उपलब्ध

तालुका कृषी अधिकारी अंतर्गत प्रमुख पिकांची बियाणे मागणी क्विंटल संकरित ज्वारी ३७८, भात २,५४८, मका १,०९५, तूर २७०, भुईमूग २२४, सोयाबीन ६,४२०, कापूस बीटी ४५० याप्रमाणे असून, त्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. (latest marathi news)

Agricultural assistant demonstrating soybean germination test.
Nashik Unseasonal Rain Damage : ‘वळिव’ग्रस्तांना साडेपाच लाखांची मदत; मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख

टंचाई व अधिक मागणीचे बियाणे

खरीप हंगामात महाबीज व खासगी बियाणे उत्पादकांमार्फत ज्वारी, भात, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग इत्यादी प्रमुख पिकांचा बियाणे पुरवठा झालेला आहे. पिकांच्या बियाण्यांचा महाबीज व खासगी बियाणे उत्पादकांमार्फत मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आल्याने मागील वर्षी शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासला नाही.

२०२०-२५ या वर्षात रोमगार हमी योजनेंतर्गत तालुक्यास ६९६ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, लाभार्थी निवड करून अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरू आहे. पाऊस पडल्यावर आंबा, पेरू, चिकू या पिकांची लागवड करण्यात येणार आहे.

सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुक्यास ४०० क्विंटल सोयाबीन बियाणेवाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सध्या लाभार्थी निवड करून प्रतिशेतकरी ०.४० याप्रमाणे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्या कार्यक्षेत्रात बीजप्रक्रिया मोहीम राबवीत आहे.

२०२०-२५ या वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यास ६९६ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, लाभार्थी निवड करून अंदाजपत्रके तयार करण्यात येत आहेत. पाऊस पडल्यावर आंबा, पेरू, चिकू, बांबू या पिकांची लागवड करण्यात येणार आहे.

सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुक्यास ४०० क्विंटल सोयाबीन बियाणे वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सध्या लाभार्थी निवड करून प्रतिशेतकरी ०.४० याप्रमाणे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

"नवापूर तालुक्यात या पावसाळ्यात सुरवातीला कमीत कमी १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची पेरणी करू नये."

-रविशंकर पाडवी, नवापूर तालुका कृषी अधिकारी

Agricultural assistant demonstrating soybean germination test.
Pune Rain Water Issue : पाणी साचते, पैसा मुरतो! गटारे बंद, महापालिका पडली उघडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.