नंदुरबार : गावापासून रुग्णालयापर्यंत जायला रस्ता नाही. पायवाट आहे, मात्र ती नदीतून जाते. सध्याच्या जोरदार पावसामुळे नदीलाही पूर. त्यामुळे गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात न्यावे कसे? असा प्रश्न कुटुंबीयांना पडला असला तरी प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेला रुग्णालयात पोहोचविणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन कुटुंबातील तिघा-चौघांनी थेट नदीतील पुराच्या पाण्यातून बांबूची झोळी करून आठ किलोमीटर पायपीट करीत रुग्णालयात पोहोचविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या गरोदर मातेने वाटेतच गोंडस बाळाला जन्म दिला. (Woman perilous journey through flood to give birth in satpuda )