नंदुरबार : घरची परिस्थिती हलाखीची, ग्रामीण भागात राहून शिक्षणही जेमतेम केले. त्यानंतर नोकरीच्या शोधात एका कंपनीत कामाला तो लागला. मात्र कोरोनाकाळात नोकरकपातीच्या धोरणाने त्याची नोकरीही हिरावली, मात्र तो खचला नाही, त्याला लहानपणापासूनच छंद असलेली फोटोग्राफी त्याच्या जीवनाचा आधार बनली.
आज तो नोकरीपेक्षाही जास्त कमावतो, एवढेच नव्हे तर फोटोग्राफीचा प्रशिक्षणातून अनेक उत्कृष्ट छायाचित्रकारही घडविण्याचे काम हाती घेतले आहे. ही कथा नव्हे तर वास्तव आहे ते काथर्दा (ता. शहादा) येथील रहिवासी असलेला भीमराज बागले या तरुणाचे. (Bhimraj of Katharda learned photography after losing his job during corona)