Nandurbar News : दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांची दुरवस्था तर आहेच, मात्र आरोग्य केंद्रांची वाहनेही अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. जी रस्त्यात कुठेही बंद पडतात, काही ठिकाणी डॉक्टर राहत नसल्याचे आढळले आहे.
दोन वर्षांपूर्वी दिल्या गेलेल्या नवीन रुग्णवाहिका गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.(displeasure about health system in remote areas)
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २१) झाली. या वेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार मंचावर उपस्थित होते. सभेला सदस्य राया मावची व सदस्य रतन पाडवी हे सदस्य उपस्थित होते.
विषयपत्रिकेवरील विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यात कोणतेही ठोस निर्णय न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विषय समितीचा आढावा घेताना कृषी विभागामार्फत जिल्ह्यात ३४५ विहिरी मंजूर असल्याचे सांगण्यात आले.
त्यात ९६ लाभार्थ्यांनी ऑनलाइन कागदपत्रे अपलोड केली आहेत. तसेच ठिबक सिंचन व स्प्रिंकलरचेही प्रस्ताव मंजूर झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्याचा आढावा घेताना सदस्य रतन पाडवी म्हणाले, की काल मांडवा आरोग्य केंद्राला भेट दिली असता तेथे एकही डॉक्टर आढळून आले नाहीत.
कर्मचारीही नसतात. एका महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाताना आरोग्य केंद्राचे वाहन रस्त्यात बंद पडले. त्या महिलेवर काय बेतली असेल याचा अंदाज करता येत नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत शेकडो योजना मंजूर आहेत. मात्र वर्षभरापासून कामे बंद पडली आहेत.
उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असून, ही योजना फक्त नावालाच आहे काय, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी उपस्थित केला. काही दिवसांनी अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर होणार आहे.
पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करण्यात येऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. ठेकेदारांना वेळेत कामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत शेकडो कामे मंजूर आहेत. मात्र वर्षभरापासून कामे बंद आहेत.
पाणीटंचाईसाठी गंभीर स्थिती असलेल्या धडगाव तालुक्यात कामे सुरू नसून का कामे करण्यात येत नाहीत, असा प्रश्न सदस्य रतन पाडवी यांनी उपस्थित केला. आगामी काळात पाणीटंचाई निश्चितच गंभीर होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करून उपाययोजनांबाबत चर्चा झाली आहे.
कामे सुरू असलेल्या ठेकेदारांना लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे मुदतीत कामे न करणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांकडून कामे काढून घेण्यात आली आहेत, अशी माहिती अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली.
कामात दिरंगाई नको
जलजीवनच्या कामांची गुणवत्ता तपासताना अंदाजपत्रक नसताना व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत स्वच्छता विभागाचे अधिकारी भेट देऊन पाहणी करीत आहेत. किती कामांची, योजनांची शास्त्रीय पद्धतीने पाहणी केली, असा प्रश्न सदस्य राया मावची यांनी उपस्थित केला.
यावर नवापूर तालुक्यात किमान पाच ते सहा कामांची पाहणी केल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत, यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांना सोबत घ्यावे. कामाबाबत तक्रारी येऊ नयेत व यात कोणतीही दिरंगाई करण्यात येऊ नये, अशा सूचना अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.