Nandurbar ZP School : नवीन शैक्षणिक वर्षाला जल्लोषात सुरवात करून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होत आहे. मात्र काही ठिकाणी शाळांची रंगरंगोटी, तर काही ठिकाणी शाळा इमारतींची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता आदी विविध समस्याही दिसून आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या प्रश्नाकडे प्रशासन व पदाधिकारी यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वल्गना करीत आहे, तर दुसरीकडे प्राथमिक शाळांची अवस्था दयनीय आहे. ( Zp school start from today in district )
अनेक ठिकाणी शाळा इमारती जीर्ण झाल्या आहेत. काहींचे पत्र उडाले आहेत, ते अद्याप जैसे थे आहेत. काहींचे हवेत वाकलेले पत्रेही सरळ केलेले नाहीत, काही ठिकाणी वर्ग जास्त मात्र शिक्षक कमी असेही चित्र आहे. त्यासाठी रिक्त पदांची भरती करून पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे, शाळेत सुविधा पुरविणे अग्रक्रम ठरतो, मात्र तालुक्यात तसे चित्र दिसून आले नाही. शिक्षक मोठ्या प्रमाणात धडपड करतात, शाळा सजवितात, गुणवत्तावाढीसाठी उपक्रम राबवितात, मात्र त्यासाठी पूरक सुविधा देणे शासन-प्रशासनाचे काम आहे. (latest marathi news)
त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. अनेक शाळांच्या प्रांगणात पावसाचे पाणी तुंबते, शाळांना गळती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्सुकता फारशी दिसून येत नाही. त्यातूनच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आता शहरी भागातील शाळांची वाट धरू लागल्याचे चित्र आहे.
खासगी शाळांमध्ये उत्साह
भालेर येथील क. पु. पाटील विद्यालयासह अनेक खासगी शाळा परिसरात आहेत. शनिवारी शाळा प्रवेशासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच त्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही नवोदिताचे स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षकांनी पुस्तके वितरणासह स्वागताची तयारी केली आहे. मात्र काही ठिकाणी शाळांच्या दुरवस्थेमुळे नाराजीचे सूर उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.