"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. लहान मुलीची हत्या करून इमारतीवरून उडी घेत पत्नीने आत्महत्या केली. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
nashik crime news in marathi
nashik crime news in marathiesakal
Updated on

पंचवटी : आडगाव शिवारातील एका विवाहितेने दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीहुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.०८) रोजी घडली आहे. पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून हे कृत्य करीत असल्याचा व्हिडिओ केला आहे. अश्विनी स्वप्नील निकुंभ (वय ३९) (रा. हरिवंदन अपार्टमेंट प्लॅट नंबर १३, इच्छामनी नगर, नांदूर जत्रा - नांदूर लिंक रोड नाशिक) त्या विवाहितेचे नाव असून मुलगी आराध्या वय ८ व अगस्त्या वय २ असे मुलीचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निकुंभ परिवार हा जत्रा नांदूर लिंक रोडवर आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. बुधवार ता.०८ रोजी सकाळी प्रथम आराध्या हीचा व्हिडिओ तयार केला व नंतर अश्विनी हिने तिचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर सात ते आठ वाजेच्य दरम्यान विवाहित अश्विनी निकुंभ (वय ३०) हिने आठ वर्षाच्या आराध्या व दोन वर्षाची अगस्त्य हिस पाहिले विष पाजले आणि स्वतः राहते घराच्या इमारतीहून उडी मारून आत्महत्या केली.

"सुसाईड नोटमध्ये केली शेवटची इच्छा व्यक्त"

अश्विनी आणि त्यांच्या मोठ्या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकुंभ यांच्यासह त्याचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी सोमवंशी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे. यात त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मृतदेहास पतीला हात लावू न देता आई व भावाने अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Crime News News in Marathi)

nashik crime news in marathi
फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

आई व मुलीचा व्हिडिओ

"आईचा व्हिडिओ"

आई आत्महत्या करण्या करण्यापूर्वीचा हृदय हलवणार व्हिडिओ आहेत. यात नवऱ्याने दिलेल्या त्रासाबद्दल उल्लेख केला आहे. आम्ही गेल्या नंतर किंमत समजेल असे म्हटले आहे. नवरा घेत असलेल्या संशयाबाबत सांगत दोन मुली माझ्या असून मी त्यांना सोबत घेऊन चालली आहे असे म्हंटले आहे

मुलीचा व्हिडिओ

मृत्यूपूर्वी आराध्या हीचा देखील व्हिडिओ तयार केलेला आहे यात पप्पा तू माझ्या आईला फार त्रास दिलेला आहे, चाललो आहे... आता तू तुझ्या कुटुंबीयांसोबत सुखी रहा असा संदेश त्यात दिलेला आहे.

nashik crime news in marathi
फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.