Power Cut : वीज केंद्रात बिघाडामुळे धुळे अंधारात; महावितरणची माहिती

Power Cut : वीज केंद्रातील बिघाडामुळे १ ऑक्टोबरला धुळे शहर अंधारात गेले.
power cut
power cutesakal
Updated on

धुळे : वीज केंद्रातील बिघाडामुळे १ ऑक्टोबरला धुळे शहर अंधारात गेले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग्रा रोडस्थित १३२ केव्ही वीज उपकेंद्राशी निगडित यार्डबाहेरील ३३ केव्ही नेर व नकाणे या वाहिन्यांच्या वीजखांबावरील व्ही क्रॉस अर्मचे क्लंप तुटले. त्यामुळे रात्री आठला दोन्ही वाहिन्या एकमेकांच्या संपर्कात येऊन बिघाड निर्माण झाला. (Due to failure in power station city is in dark information of mseb )

परिणामी, धुळे शहराला वीजपुरवठा करणारे चक्करबर्डी पॉवर हाउस व नकाणे ३३/११ केव्ही उपकेंद्र बंद पडले. त्याची महावितरण कर्मचाऱ्यांनी दखल घेत रात्री दहाला नेर व नकाणे वाहिन्या दुरुस्तीतून पूर्ववत केल्या. नकाणे वाहिनीवरील पॉवर हाउस व उपकेंद्राचा वीजपुरवठा ३३ केव्ही नेर वाहिनीवरून रात्री दहा ते साडेअकरापर्यंत सुरू करण्यात आला. त्याच क्षणी नकाणे वाहिनीवर पुन्हा कंडक्टर स्नॅपइंग झाले. (latest marathi news)

power cut
Nashik Power Cut : मालेगावात तब्बल 18 तास बत्तीगूल! वादळामुळे झाडे, फांद्या पडल्याने वीजतारा तुटल्या

वाहिनीच्या चार ते पाच पोलवरील तार व्ही क्रॉस आर्मवरून निसटली. वाहिनीची तार तुटून झंकार वाहिनीवर पडून नकाणे वाहिनी बऱ्याच जागी नादुरुस्त झाली. अतिउंचावरील बिघाड हायड्राशिवाय दुरुस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी सर्व बिघाड दुरुस्त केले. पहाटे अडीचच्या सुमारास नकाणे वाहिनी सुरू करण्यात आली. या वाहिनीवरील चक्करबर्डी उपकेंद्राचे अरिस्टर नादुरुस्त झाले. त्यामुळे पुन्हा ही वहिनी नादुरुस्त झाली.

बिघाड दुरुस्तीनंतर १३२ केव्ही उपकेंद्र ते चक्करबर्डी उपकेंद्रादरम्यान ३३ केव्ही नकाणे वाहिनीच्या प्रत्येक खांब्याचे ग्राउंड पेट्रोलिंग केले. त्यात ३३ केव्ही नकाणे वाहिनी सकाळी पावणेनऊला सुरू करण्यात आली. पहाटे तीनपासून ते सकाळी पावणेनऊपर्यंत शहराचा वीजपुरवठा नेर वाहिनीवरून पॉवर हाउस व नकाणे उपकेंद्रामार्फत करण्यात आला. अशा आकस्मित घटनांमुळे शहरातील वीजग्राहकांची गैरसोय झाली, असे महावितरण कंपनीने सांगितले.

power cut
Power Supply Cut Off : हजारावर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; धुळे विभागातर्फे 30 कोटींवर थकीत वीजबिलांची वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.