Sarangkheda Yatra : नाशिकच्या अश्व रणरागिणी चेतक फेस्टिव्हलला

वय अवघे सहा ते १९ वर्षांच्या दरम्यान, मात्र त्या चार रणरागिणींची जिद्द वाखाणण्याजोगी.
Chairman of Chetak Festival Jaipalsinh Rawal, Sub Divisional Police Officer Datta Pawar, Sarpanch Prithviraj Rawal, Secretary of Agricultural Produce Market Committee Sanjay Chaudhary, Organizer of Chetak Committee Pranavrajsinh Rawal while welcoming the warriors who came from Nashik on horseback.
Chairman of Chetak Festival Jaipalsinh Rawal, Sub Divisional Police Officer Datta Pawar, Sarpanch Prithviraj Rawal, Secretary of Agricultural Produce Market Committee Sanjay Chaudhary, Organizer of Chetak Committee Pranavrajsinh Rawal while welcoming the warriors who came from Nashik on horseback.esakal
Updated on

Sarangkheda Yatra : वय अवघे सहा ते १९ वर्षांच्या दरम्यान, मात्र त्या चार रणरागिणींची जिद्द वाखाणण्याजोगी.

नाशिक येथून आपल्या प्रशिक्षकांबरोबर प्रवासास सुरवात केल्यावर या अश्वप्रेमी रणरागिणींनी मजल-दरमजल करीत अवघ्या पाच दिवसांत २५० किलोमीटरचे अंतर पार करून सारंगखेडा येथील अश्वमेळा गाठला. (Nashik horse Ranragini at Chetak Festival at sarangkheda nandurbar news )

या वेळी गावाच्या वेशीवर त्यांचे जल्लोषात चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सरपंच पृथ्वीराज रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, चेतक समितीचे आयोजक प्रणवराजसिंह रावल, विनीत गिरासे यांच्यासह नागरिकांनी स्वागत केले.

नाशिक येथून मंगळवारी (ता. १९) चार जणी सारंगखेड्याकडे निघाल्या. मुली असल्या म्हणजे काय झाले, अंगी जिद्द व चिकाटी कायम ठेवून मागे न पाहता अश्व आणि सैन्य दलात सहभागी होण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून २५० किलोमीटरचे अंतर पार करून जनजागृती करीत शनिवारी (ता. २३) सारंगखेडा गाठले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून त्यांच्यावर स्वागतासह कौतुकांचा वर्षाव करण्यात आला.

Chairman of Chetak Festival Jaipalsinh Rawal, Sub Divisional Police Officer Datta Pawar, Sarpanch Prithviraj Rawal, Secretary of Agricultural Produce Market Committee Sanjay Chaudhary, Organizer of Chetak Committee Pranavrajsinh Rawal while welcoming the warriors who came from Nashik on horseback.
Sarangkheda Yatra : सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वप्रीमियर लीग आणि स्पर्धेचे आकर्षण

प्रशिक्षकांबरोबर गाठला अश्व बाजार...

अश्व रणरागिणी हृदया पृथ्वीराज अंडे (वय १५), स्वरांगी कुणाल अंडे (१४), प्रतीक्षा सोमनाथ मुंजे (१९) व जागृती उदय गांगुर्डे (११) यांच्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक विशालराजे भोसले आहेत. आजच्या मुला-मुलींना अश्व, आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असलेली यात्रा आणि फेस्टिव्हलची माहिती मिळावी, तसेच आज मुली मागे न राहता त्यांच्यात अश्व आणि सैन्यदलाची आवड निर्माण व्हावी म्हणून जनजागृतीचा त्यांचा मनोदय आहे.

त्यानुसार त्या येताना रस्त्यातील गावागावांत जनजागृती करीत आल्या. या मुलींचे गावागावांत स्वागत करण्यात आले. त्यांच्या या अनोख्या शैलीचे कौतुक होत आहे. गेल्या वर्षी १४ वर्षीय हृदया अंडे घोड्यावर स्वार होत नाशिक ते सारंगखेडा हे सुमारे २५० किलोमीटर अंतर पार करीत चेतक फेस्टिव्हलसाठी आली होती. ती नऊ वर्षांची असताना तिने अश्व सवारी सुरू केली आहे.

Chairman of Chetak Festival Jaipalsinh Rawal, Sub Divisional Police Officer Datta Pawar, Sarpanch Prithviraj Rawal, Secretary of Agricultural Produce Market Committee Sanjay Chaudhary, Organizer of Chetak Committee Pranavrajsinh Rawal while welcoming the warriors who came from Nashik on horseback.
Sarangkheda Yatra: थंडीत घुमतोय घोड्यांचा टापांचा आवाज; दत्त प्रभूंच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.