Nashik Fraud Crime : व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून सहा कोटी रुपयांचे अंतरिम कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १ कोटी २६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संशयितांनी यासाठी बनावट दस्तऐवज बनविण्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात न्यायालयाच्या आदेशान्वये तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (1 Crore 26 Lakh fraud with lure of loan nashik fraud crime)
विश्वजीत ऊर्फ संजय प्रभाकर चांदोरकर (५४, रा. मीरा रोड, ठाणे), अनुज विश्वजीत ऊर्फ संजय चांदोरकर (३२, रा. मीरा रोड, ठाणे), राम जांभेकर (४०, रा. इंदूर, मध्यप्रदेश) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील मोहन सरोदे (रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, सरोदे यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता. त्यामध्ये नुकसान झाल्याने त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्याचा गैरफायदा घेत संशयितांनी संगनमताने सरोदे यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ६ कोटी रुपयांचे अंतरिम कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यासाठी दोन टक्के रक्कम द्यावी लागेल, असे खोटे सांगून बनावट दस्तऐवज तयार केले. तसेच, सरोदे यांच्याकडून २०१९ मध्ये प्रोसेसिंग फिच्या नावाखाली १ कोटी २६ लाख ७९ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणत्याही स्वरूपाचे कर्ज मंजूर न झाल्याने सरोदे यांनी विचारणा सुरू केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याच्या निकालाअंती संशयितांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाने सातपूर पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार सातपूर पोलिसांत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक एस.एस. जाधव हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.