Nashik Crime News : कंपनीचा विस्तार करण्यासाठी एक कोटींच्या कर्जांची आवश्यकता होती. त्यासाठी दलालमार्फत ठाण्याच्या ग्लोबल फायनान्स कंपनीशी करारानुसार दोन कोटीचा बोगस डीडी देत नाशिकच्या उद्योजकाला एक कोटीचा गंडा घालण्यात आला.
याप्रकरणी अंबड पोलिसात मनोज चंद्रकांत गांगुर्डे (रा. अश्विननगर, सिडको), सागर दिलीप कराड (मखमलाबाद रोड), महेश प्रभुराम शिंदे (रा. भिवंडी, ठाणे), मुकेश गुळवी, राघवेंद्र ऊर्फ विक्रांत कराड, नीलेश तोंडलेकर व आणखी पाच संशयित विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (1 Crore fraud by showing lure of loan nashik crime news)
रोशन सुनील तांदळे (रा. केवलपार्क, अंबड लिंकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, तांदळे व मयुर सांबरे यांनी भागीदारीत आरव इंडस्ट्रीज नावाची बॉलपेन बनविण्याची कंपनी अंबड औद्योगिक वसाहतीत सुरु केली कंपनीचे काम वाढल्याने त्यांना विस्तार करायचा होता.
त्यासाठी त्यांना एक कोटीची आवश्यकता होती. तांदळे यांनी त्यांच्या ओळखीचा एजंट मनोज गांगुर्डे याच्याशी संपर्क साधला. त्याने मॉर्गेजसाठी प्रॉपर्टीवर कर्जाचा पर्याय दिला. त्यानुसार तांदळे यांनी त्यांचा मित्र केतन मोरे यांच्या कंपनीवर कर्ज संमतीने कर्ज घेण्यास सांगितले. त्यानुसार ठाण्याच्या ग्लोबल फायनान्स कंपनीने कर्ज देण्यास होकार दिल्यानंतर त्यासंदर्भातील व्यवहारासाठी ठाण्याला गेले.
त्यावेळी गांगुर्डे याचा मित्र सागर कराड, ठाण्यातील एजंट महेश शिंदे, मुकेश गुळवी यांनी दोन कोटी कर्ज कंपनीकडून दिले जाईल.
यात तांदळे यांना एक कोटी रोख रक्कम कंपनीला द्यावी लागेल व एक कोटी रक्कम सात वर्षात बिनव्याजी परत करण्याचे ठरले. त्यानुसार प्रक्रिया करण्यात आली. कर्जाच्या २ कोटींचा डीडी घेण्यासाठी तांदळे, गांगुर्डे, कराड हे ठाण्याला गेले.
त्यावेळी ग्लोबल फायनान्सचे अविनाश यादव व काही संशयित रोख १ कोटी घेण्यासाठी नाशिकला आरव कंपनीत आले. डीडी तांदळे यांच्या हाती दिल्यानंतर त्याचा शहानिशा केल्यानंतर नाशिकमध्ये सांबरे यांच्याकडून अविनाश यास एक कोटींची रोकड देण्यात आली.
नंतर डीडी बॅंकेत जमा केला असता, सायंकाळ होऊनही कर्जाची रक्कम जमा होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदरचा प्रकार ८ जून ते २ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात १ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.