नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेला 1.38 कोटींचा नफा

नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात एक कोटी ३८ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.
 Money
Moneyesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात एक कोटी ३८ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. संस्थेचे चेअरमन नितीन पवार यांनी माहिती दिली. गेल्या आठवड्यात संस्थेची मासिक सभा झाली. त्यात पतसंस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. संस्थेने ऑडीट वर्ग अ राखण्यात पुन्हा यश मिळविले आहे.

संस्थेची एकुण उलाढाल पंचवीस कोटींच्या पुढे पोहोचली आहे. संस्थेचे भागभांडवल ११.०१ कोटी असुन १४.१९ कोटी कर्ज आहे. संस्थेने कुटुंब कल्याण संरक्षण ठेव योजना सुरु केली आहे. चालु आर्थिक वर्षात सहा सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली. कल्याण निधी अनुदान योजनेअंतर्गत सात सभासदांच्या वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत म्हणुन संस्थेने दिले आहे. संचालक मंडळाने कर्जाचा व्याजदर तेरा वरून साडे दहा टक्के केला आहे. कर्ज मर्यादा साडे तीन लाखांवरून सात लाखांपर्ंत केली आहे. संस्थेचे भागभांडवल ३.७७ कोटी वरून अकरा कोटी एक लाखा पर्यंत पोहोचले आहे. नफा ५२.७३ लाखांवरुन १ कोटी ३८ लाख रुपये नफा मिळालाआहे. एनपीए शुन्य टक्के राखण्यात आला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग वाजे यांनी आभार मानले. सचिव संदिप दराडे, संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, पंडितराव कटारे, गोटीराम खैरनार, मधुकर आढाव, विक्रम पिंगळे, भाऊसाहेब पवार, नितीन भडकवाडे, अमित आडके, किशोर वारे, मंगला बोरसे, विमल घोडके व्यवस्थापक संदिप सोनवणे, मिलींद अहिरे, मनोहर गायकवाड उपस्थित होते.

 Money
मोरडा पाणीटंचाईचे पडसाद उमटले मंत्रालयात; आदित्य ठाकरेंनी घेतली दखल
 Money
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागाकडून 4 कोटी 36 लाखांची वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.