Market Committee Election : राज्यातील 27 हजारांवर ग्रामपंचायतींना 1 हजार 83 कोटी निधी झाला वितरित

election
electionesakal
Updated on

Market Committee Election : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील २७ हजार २६७ ग्रामपंचायतींना १ हजार ३९ कोटी १० लाख, तर पंचायत समित्यांना २२ कोटी ५१ लाख, जिल्हा परिषदांना २१ कोटी ८८ लाख असा एकूण १ हजार ८३ कोटी ४९ लाख रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी आज ग्रामविकास विभागाने वितरित केला.

त्यात नाशिक जिल्ह्यातील १ हजार ३७८ ग्रामपंचायतींसाठीच्या ६० कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांचा समावेश आहे. (1 thousand 83 crore funds been distributed to 27 thousand gram panchayats in state Market Committee Election nashik news)

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात वितरित झालेला निधी रुपयांमध्ये दर्शवतो) : बागलाण-१२९ (५ कोटी ८२ लाख ७८ हजार), चांदवड-९० (३ कोटी ६७ लाख ८७ हजार), दिंडोरी-१२१ (५ कोटी २० लाख ७५ हजार), देवळा-४२ (२ कोटी ३० लाख ९४ हजार), इगतपुरी-९२ (३ कोटी ७४ लाख ६४ हजार),

कळवण-८६ (३ कोटी २७ लाख ५७ हजार), मालेगाव-१२५ (६ कोटी ४० लाख २९ हजार), नांदगाव-८८ (३ कोटी २१ लाख ८८ हजार), नाशिक-६६ (३ कोटी ५४ लाख ३८ हजार), निफाड-११८ (७ कोटी ३२ लाख १३ हजार), पेठ-७३ (१ कोटी ९७ लाख ४३ हजार), सुरगाणा-६१ (२ कोटी ९६ लाख ४० हजार),

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

election
Nashik Market Committee Election: माजी खासदार पिंगळेंविरूद्ध दोन्ही हरकती फेटाळल्या! छाननीमध्ये 170 अर्ज वैध

सिन्नर-११४ (४ कोटी ९१ लाख २४ हजार), त्र्यंबकेश्‍वर-८४ (२ कोटी ७० लाख ९५ हजार), येवला-८९ (३ कोटी ८६ लाख ७८ हजार). पंचायत राज संस्थांमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये १०, १०, ८० टक्के याप्रमाणे अनुक्रमे निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सध्यस्थितीत २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समिती आणि ६३५ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार कामे करावयाची आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाने यापूर्वी कळविलेले आहे. गावांच्या गरजांची निश्‍चिती करून कामे ठरवण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.

स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल-दुरुस्ती, पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टींग, वॉटर रिसायकलिंग यावर ५० टक्के निधी खर्च करावयाचा आहे.

election
Covishield Demand : कोरोना पार्श्वभूमीवर 10 हजार कोव्हीशिल्डची मागणी; आरोग्य उपसंचालकांना NMCचे पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()