CITILINC बससेवेची वर्षपुर्ती! 70 हजार नाशिककरांना आधार

शहर बससेवा नाशिककरांची जीवनवाहिनी होत आहे.
Nashik city bus service
Nashik city bus serviceesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल की नाही? याबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. सिटीलिंकच्या बससेवेला वर्ष पूर्ण होत असताना प्रतिदिन जवळपास सत्तर हजार प्रवाशांची ने- आण होत आहे. तर, वर्षभरात तब्बल एक कोटी ६३ लाख प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतल्याने शहर बससेवा नाशिककरांची जीवनवाहिनी होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा महापालिकेने घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. परंतु, तत्कालीन महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बससेवेचा पांढरा हत्ती पोसण्यास नकार दिला. जवाहरलाल नेहरू नागरी पुर्नरुत्थान योजनेंतर्गत महापालिकेला शंभर बस मिळणार होत्या, परंतु बससेवा चालविण्यास नकार देताना त्या बस परिवहन महामंडळाकडे देण्यास ना हरकत असल्याचे पत्र महापालिकेने महामंडळाकडे दिले. त्यानंतर साधारण पाच वर्षे बस चालल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे सांगत बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शहर बससेवा सुरू करण्याच्या हालचाली झाल्या. साधारण दोन ते अडीच वर्षे अनेक समस्या पार करत बससेवा खासगीकरणातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर खासगी बस कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. दिल्ली व पुणे स्थित कंपन्यांकडून आखून दिलेल्या मार्गिकांवर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. किलोमीटर मागे होणारा तोटा, बी- ४ धोरणानुसार बस नसल्याने प्रदूषण वाढण्याची शक्यता यावरून निर्माण झालेला वाद अशा अनेक समस्या पार करत अखेरीस ४ जुलैला बससेवा सुरू झाली. महापालिकेच्या शहर बससेवेची वैशिष्टे म्हणजे लोकप्रतिनिधींचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप सेवेत नाही. राज्य भरात महापालिकेकडून सुरू असलेल्या बससेवा तोट्यात असली तरी नाशिकमध्ये प्रतिकिलोमीटर उत्पन्न वाढविण्यात अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे.

Nashik city bus service
शहर परिसरातील दुचाकी चोरीचे प्रकार सुरूच; पोलिसांना अपयश

प्रतिकिलोमीटर तोटा, मात्र प्रवाशांचे समाधान

देश पातळीवर सार्वजनिक बससेवा फायद्यात नाही. त्यामुळे नाशिकमधील बससेवेसंदर्भात सेवा फायद्यात यावी असा निरर्थक आग्रह लोकप्रतिनिधींचा होता. वर्षभरात शहर बससेवेचा अर्थकारणातून विचार करताना ७१. १८ कोटी रुपये खर्च आला. तर ३८. ८४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले. ३२ कोटी रुपयांचा तोटा आला असलातरी प्रतिकिलोमीटर उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या प्रतिकिलोमीटर उत्पन्न ४५ रुपयांपर्यंत पोचले आहे. प्रतिकिलोमीटर उत्पन्न महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सध्या ४६ मार्गावर सेवा दिली जात आहे. बसची संख्यादेखील २१० पर्यंत पोचली आहे. दिवसाला ७० हजार प्रवासी मिळत आहे. प्रतिदिन उत्पन्न वीस लाख रुपयांच्या वर पोचले आहे.

शहरासह ग्रामीण भागाला फायदा

पारंपरिक मार्गिका ऐवजी फायद्याच्या मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली. त्यातही शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली. पिंपळगाव बसवंत, त्र्यंबकेश्‍वर, घोटी, वाडीवऱ्हे, दिंडोरी, चांदोरी, सायखेडा, भगूर, सिन्नर या शहरापासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावरील गावापर्यंत बससेवा पोचल्याने नागरिकांना फायदा तर झालाच त्या शिवाय उत्पन्नातही वाढ झाली. बससेवा फायद्यात आणण्यासाठी विविध योजना अमलात आल्याने त्याचा फायदा किलोमीटर मागचा तोटा कमी होण्यात झाला. सीएनजी व डिझेलच्या किमतीत दीड वर्षात ३३ टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम तोटा वाढण्यात झाला.

Nashik city bus service
सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

शहर बससेवेचे फायदे

- खासगी वाहनांचा वापर कमी.

- सार्वजनिक वाहतुकीमुळे प्रदूषण व पार्किंग समस्या सुटण्यास मदत.

- विद्यार्थी, कामगार वर्गाला सेवा.

''सिटीलिंक कंपनीकडून सुरू असलेल्या शहर बससेवेला वर्षपूर्ती होत आहे. वर्षभरात किलोमीटर मागील तोटा कमी करण्यात यश मिळाले आहे. नाशिककरांना चांगली सेवा देतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात यश आले आहे.'' - रमेश पवार, आयुक्त तथा अध्यक्ष सिटीलिंक कंपनी.

Nashik city bus service
नाशिक : आधार कार्ड दुरुस्तीच्या खर्चाचा नागरिकांना भुर्दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.