Nashik News : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील सिंचनाच्या १० कोटी २७ लाख रुपयांच्या १२ गेटेड कॉंक्रिट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
बंधाऱ्यांच्या कामाची लवकरच सुरवात होईल. (10 crore for dam in Yeola taluka nashik news)
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील सोमठाण जोश क्रमांक १० गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ६८ लाख ४८ हजार, क्रमांक ११ बंधाऱ्यासाठी ७७ लाख ८१ हजार, क्रमांक १३ बंधाऱ्यासाठी ६९ लाख ७ हजार, क्रमांक १४ बंधाऱ्यासाठी ६८ लाख २० हजार, ममदापूर क्रमांक १६ बंधाऱ्यासाठी १ कोटी १९ लाख ८४ हजार, देवदरी क्रमांक चार बंधाऱ्यासाठी ७७ लाख २८ हजार, क्रमांक पाच बंधाऱ्यासाठी ८४ लाख २८ हजार.
क्रमांक सहा बंधाऱ्यासाठी ७७ लाख ३७ हजार, रहाडी क्रमांक १३ बंधाऱ्यासाठी १ कोटी १ लाख ६८ हजार, क्रमांक १४ बंधाऱ्यासाठी १ कोटी ११ लाख ६९ हजार, चांदगाव क्रमांक तीन बंधाऱ्यासाठी ७६ लाख ४८ हजार, चांदगाव क्रमांक चार बंधाऱ्यासाठी ९६ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलसंधारणाच्या विकासकामांमुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अधिक फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.