Nashik News : गिरणा धरणाच्या जलाशयातल्या मासेमारीवर निर्भर असणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आदिवासी बांधवांना यंदा आमदार सुहास कांदे यांनी मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध करून दिले आहे.
रविवारी (ता. १०) धरणाच्या जलाशयात दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. (10 lakh fish seeds in Girna dam reservoir MLA suhas Kande help to local fishermen Nashik News)
आंध्र प्रदेशातील कटला जातीचे मागविण्यात आलेले मत्स्यबीज शिवसेना (शिंदे गटाच्या) महिला आघाडीच्या शहरप्रमुख रोहिणी मोरे यांच्या हस्ते व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मत्स्यबीज सोडण्यात आले.
सोडण्यात आलेली मत्स्यबीज पाच ते सहा महिन्यांत तयार होऊन हा मासा मासेमारी करिता उपलब्ध होत असतो.
सध्या कमी पावसामुळे गिरणाच्या धरणातील जलाशयात माशांची कमतरता जाणवत असल्याने स्थानिकांना मुबलक प्रमाणात मासेमारी करता यावी व त्यांच्या उदरनिर्वाहाची सोया व्हावी, या हेतूने आमदार सुहास कांदे यांनी पुढाकार घेत मत्स्यबीज दिले. जलाशयात बीज सोडण्यात आल्याने स्थानिक मासेमाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
या वेळी ज्ञानेश्वर कांदे, सुरेशजी शेलार, बापू शेलार, देवेंद्र शेलार, गोरखबाबा ठोके, रोहिणी मोरे, राजेंद्र मोरे, संजय मोरे, समाधान गायकवाड, दीपक पवार, राजाराम गायकवाड, हरीश ढोले, शांताराम वाघ, केवळ वाघ, शिवाजी वाघ, रतन मोरे, भुरा सोनवणे, संदीप शिवदे, काशीनाथ ढोले, बाळू शिवदे, युवराज शिवदे, बापू बोरसे, दादाजी बोरसे, बाजीराव पवार, मांगू गोरे, भागचंद गोरे, गोपाळ ढोले आदींसह आदिवासीबांधव उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्थानिक मच्छीमारांवरील अन्याय सहन करणार नाही
गिरणा धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईतल्या एका खासगी ठेकेदाराला देण्यात आल्यानंतर स्थानिकांना गिरणाच्या जलाशयातून पारंपरिक मासेमारी करता येत नव्हती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली होती.
आमदार सुहास कांदे यांनीही स्थानिक मच्छीमारांवरील अन्याय सहन करणार नाही. ठेकेदाराला जशास तसे उत्तर देऊ.
धरण मच्छीमार महामंडळाच्या ताब्यातून मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांच्या धरणात जमिनी गेल्या असून, मच्छीमारीवर मूळ हक्क कुणालाही डावलता येणार नसून गरज पडल्यास सरकारविरोधात जाण्याची भूमिका गेल्या वर्षी घेतली होती.
मच्छीमार बांधवांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी अन्वर खान यांना व्यासपीठावर बोलावून त्यांनी तक्रार मागे घेण्यास सांगितले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.