Crime Update : BMWच्या लोभापायी दोघांना 10 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

Nashik fraud crime News
Nashik fraud crime News esakal
Updated on

नाशिक : महागडी व उच्चभ्रू सोसायटीत मानाची समजली जाणाऱ्या बीएमडब्ल्यु चारचाकी वाहनाच्या हव्यासापोटी दोघांना १० लाखांचा गंडा एका संशयिताने घातला. एका संशयिताने बीएमडब्ल्यु कंपनीमध्ये उच्च पदावर असल्याची बतावणी करून दोघांना जवळपास निम्म्या किमतीमध्ये बीएमडब्ल्यु देतो असे आमिष दाखविले आणि १० लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार गेल्या एप्रिल महिन्यात घडला आहे. (10 lakh fraud of 2 for BMW case Filed Nashik Latest Crime News)

Nashik fraud crime News
देवपूरचा पूल तुटल्याने अंत्यविधीसाठी ग्रामस्थ राहतात ताटकळत!

चेतन मारुती प्रभू (रा. गोकुळ शंकरनगर, गंगापूर पोलीस स्टेशनसमोर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अमितकुमार घोष याने प्रभू यांना आपण बीएमडब्ल्यू कंपनीमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एरिया सेल्स साउथ ईस्ट आशिया या पदावर असल्याचे सांगून त्यांना बीएमडब्ल्यूची टू सिरीज गाडी ही मूळ रकमेच्या 55 टक्के कमी दरात घेऊन देतो असे प्रलोभन दाखविले.

या लोभास बळी पडून प्रभू यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी घोष याच्या एचडीएफसी खात्यावर आयसीआयसीआय बँक खात्यातून आयटीजीएसद्वारे ५ लाख रुपये ट्रान्सफर केले. याचप्रमाणे प्रभू यांचे मित्र अरुणकुमार दाना यांनाही बीएमडब्ल्युची भुरळ पडली. त्यामुळे त्यांनीही ११ एप्रिल २०२२ रोजी एचडीएफसी बँक खात्यातून ४ लाख रुपये ट्रान्सफर केले.

तसेच ५० हजार रुपये रोख व ५० हजार रुपये संशयित घोष याची पत्नीच्या अकाऊंटवर ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले. असे प्रभु व दाणा यांच्या दोघांकडून ५-५ लाख असे १० लाख रुपये संशयित घोष याने घेतले. मात्र प्रत्यक्षात दोघांना बीएमडब्ल्यु काही मिळाली नाही.

याबाबत त्यांनी पाठपुरावा केला असता त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे हे अधिक तपास करीत आहेत.

Nashik fraud crime News
Gauri Pujan 2022 : किन्नरांच्या घरी महालक्ष्मी विराजमान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.