Nashik News: संदर्भसेवा रुग्णालयातील ‘कॅथलॅब’ दुरुस्तीला 10 लाख

sandarbh hospital
sandarbh hospitalesakal
Updated on

Nashik News : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील हृदयरोग विभागातील अतिमहत्त्वाची कॅथलॅब यंत्रणेची मुदत संपल्याने बंद पडलेल्या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पालकमंत्री भुसे यांनी आरोग्यसेवा उपसंचालकांशी बोलून तातडीने दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्यावर १० लाखांचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला. (10 lakhs for repair of cath lab in Referral Hospital Nashik News)

दोन महिन्यांपासून रुग्णालयात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी बंद झाल्याने संदर्भ रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात जात होते. याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत होता. या निर्णयाने रुग्णांची परवड थांबणार आहे.

प्रशासनाला पालकमंत्री भुसे यांनी तातडीने बंद पडलेली कॅथलॅब यंत्रणा दुरुस्त करून तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी (ता. २८) यंत्रणा दुरुस्तीसाठी १० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sandarbh hospital
Admission: विशेष फेरीत 3 हजार 656 विद्यार्थ्यांचे प्रवेश; पावसामुळे प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून इतकी मुदतवाढ

यामुळे लवकरच ही यंत्रणा दुरुस्त करून रुग्णांसाठी उपलब्ध होईल. दरम्यान, नवीन कॅथलॅब मशिनचा प्रस्तावही शासनाकडे प्रस्तावित असून, त्यासाठी स्वतः पाठपुरावा करीत असल्याचे भुसे यांनी स्पष्ट करीत कॅथलॅब यंत्रणेच्या पाठपुराव्याला यश येऊन लवकरच नवीन यंत्रणेला मंजुरी मिळणार आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भातून या रुग्णांवर उपचार होत असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाच्या हृदयरोग विभागातील अतिमहत्त्वाची कॅथलॅब यंत्रणा कार्यान्वित होईल.

sandarbh hospital
Nashik News: व्यापार, उद्योग संघटनांच्या साहाय्याने शहराचा विकास : आयुक्त डॉ. करंजकर यांचे आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.