Fire Accident : शहरात एका मारुती व्हॅनमध्ये गुरुवारी (ता. १६) अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटात दहा साईभक्त गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीत लहान मुलांचा समावेश असून, एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. (10 person seriously injured in an explosion while filling gas nashik news)
सीएनजीवर चालणाऱ्या अधिकृत चारचाकी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. असे असले तरी आजही घरगुती सिलिंडरमधील गॅस विशिष्ट पंपाच्या साहाय्याने वाहनाच्या टाकीत भरण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषतः हा गॅस भरून ओमनी गाड्या चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. ही घटना यातूनच घटल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीला साईदर्शनासाठी आलेले कुटुंब नगरसूल रेल्वेस्थानकावर दाखल झाले. नगरसूल येथून दुसऱ्या खासगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी भाडोत्री मारुती व्हॅन कार घेतली.
ही कार गॅस भरण्यासाठी पक्की मशीद भागात चालकाने नेली. कारमध्ये गॅस भरत असताना, हा भीषण स्फोट झाला. यात १० जण जखमी झाले असून, त्यात चार लहान बालके आहेत, तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींमध्ये आदित्य अवचारे (वय ११), सीमा कसबे, प्रदीप अवचारे, वैभव लिंबे (वय २२), विराज कसबे (वय ४), प्रतिभा लिंबे (वय ३९), वैदही कसबे (दीड वर्ष), अनुष्का कसबे (वय १४), आणि गीता कसबे (वय २२), असे एकूण दहा जणांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. आर्यन सोनवणे यांनी दिली.
घटनास्थळी माजी आमदार मारोतराव पवार, शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, माजी नगरसेवक रिजवान शेख, मुश्रीफ शहा यांच्यासह परिसरातील मुस्लिम नागरिक व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. दरम्यान, वाहनचालक तसेच गॅस भरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.