Rabi Season: दुष्काळाच्या दृष्टचक्रात रब्बीचाही झाला खेळ! येवल्यात 10 हजार हेक्टरची होणार घट

Due to lack of water for the planted onion, the onion crop is cut in the field.
Due to lack of water for the planted onion, the onion crop is cut in the field.
Updated on

Rabi Season: पावसाने अवकृपा केल्याने खरिपालाच पाणी नव्हते, आज तर अनेक गावात प्यायलाही पाणी नाही, अशा स्थितीत रब्बी हंगामाचा खेळ होऊन यंदा त्याला खो बसला आहे. पालखेड डाव्या कालव्याला फक्त महिनाभराचे आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रात कानाकोपऱ्यात रब्बी दिसेल. मात्र नऊ ते दहा हजार हेक्टर क्षेत्र घटणार आहे. त्यातही उपलब्ध पाण्यावर कांद्याचे पीक घेण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य आहे.

दुष्काळी असलेल्या या तालुक्यात शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत. तथापि, शंभरवर गावात रब्बीची पेरणी होते. पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावांत हंगाम निघण्याची शश्वती असते.

खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यातही सर्वच शेतकरी आगाद पेरणी करतात. त्यामुळे जी पेरणी होते ती मार्गी लागते. (10 thousand hectares of Rabi will be reduced in Yeola nashik agriculture news)

यंदा खरिपातील ७० हजार हेक्टरपैकी किमान ५० ते ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातात रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. शेवटी पाऊस पडेल हा आशावादही फोल गेल्याने सध्या हजारो हेक्टर जमीन ओसाड पडली आहे. पाणीच नसल्याने रब्बीचा विषयच उरलेला नसल्याची स्थिती उत्तरपूर्व भागात आहे.

खरीप पावसाअभावी वाया गेला आहे. जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. खरिपातील शेतीला लावलेले भांडवलही मका, कांदे, सोयाबीन, कपाशीची झालेली वाताहात पाहता मिळत नाही. गणेशोत्सव आणि नवरात्रही कोरडी गेल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

उत्तर पूर्व भागात अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या जलस्रोतांना थोडेफार पाणी आहे. मात्र ते पिण्यासाठीच उपयोगात आणले जात आहे. कायमस्वरूपी दुष्काळी असलेला हा तालुका रब्बीमुक्त होतो की काय, याची भीती वाटत आहेत. कारण दोन वर्षे रब्बीची पिके निघाली की पुन्हा एक-दोन वर्षे टंचाई निर्माण होते.

यंदा पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावातील कालव्याचे पाणी मिळणाऱ्या भागात हंगाम निघण्याची शक्यता आहे. त्यातच पाटबंधारे विभागाने डिसेंबर ते जानेवारीदरम्यान एकच आवर्तन देण्याचा निर्णय घेतल्याने पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. अल्प पावसावर केलेला खरिपाच्या पेरणीचा जुगार अंगलट येऊन पिके न आल्याने खर्च वाया गेला आहे.

Due to lack of water for the planted onion, the onion crop is cut in the field.
Nashik Agriculture News : पिकांच्या डिजिटल सर्वेक्षणासाठी देवळ्याची निवड : श्रीरंग तांबे

अशीच परिस्थिती रब्बीतही होऊ नये म्हणून शेतकरी सावध झाला आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या अवर्तनाच्या पाण्यावर शेततळे भरून ठेवायचे आणि रब्बीची पिके न घेता लाल कांदे लावण्याचे नियोजन सुरू आहे. याच अंदाजाने लाल कांद्याची लागवडही तालुक्यात वाढली आहे.

पेरणी १६ टक्के!

तालुक्यात अनेक शेतकरी पालखेडचे पाणी तसेच थंडीच्या भरवशावर ज्वारी, मका व हरभऱ्याची पेरणी करतात. त्यामुळे बेभरोशावर झालेल्या पेरणीमुळे रब्बीची पेरणीची आकडेवारी १६ टक्के दिसत आहे. बागायती क्षेत्रात मात्र अद्याप रब्बीकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे. विशेषतः कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. असलेले पाणी वाया जाण्यापेक्षा निघेल तसे पीक घेऊ या भरवशावर मका, हरभरा हे पीक घेतले जात आहे.

"खरिपात प्रचंड नुकसान झाले असून, दुष्काळाचा फटका रब्बीलाही बसला आहे. जलस्त्रोतांना पाणी नाही. मात्र अल्प पाण्यावर काही शेतकरी हरभरा, ज्वारीची पेरणी करत आहेत. विशेषतः पालखेडच्या पाण्याच्या भरवशावरही शेतकरी रब्बीची पिके घेत आहेत. कांदा लागवडीतही पश्चिम पट्ट्यात वाढ होत आहे." -साईनाथ कालेकर, कृषी सहाय्यक, येवला

◆ अशी आहे रब्बीची पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक - सरासरी क्षेत्र = पेरणी

ज्वारी - ४३९ - ११९

गहू - ६३५१ - ३७३

मका - २७८ - ६१९

हरभरा - ४२५३ - ८७१

एकूण - ११७८३ - १९८२

Due to lack of water for the planted onion, the onion crop is cut in the field.
Nashik Rabi Season : जिल्ह्यात रब्बीच्या अवघ्या 17 टक्के पेरण्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.