Ramzan Activity : 100 चिमुकल्यांचा दृष्टिदोष दूर करण्याचा संकल्प; रमजाननिमित्त उपक्रम

Ongoing treatment in infancy.
Ongoing treatment in infancy.esakal
Updated on

Ramzan Activity : पवित्र रमजान पर्वाचे औचित्य साधत सुमारे १०० चिमुकल्यांचा दृष्टिदोष दूर करण्याचा अनोखा संकल्प बबलू शेख यांनी केला आहे. त्यातील दोन दिवसात १४ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचा दृष्टिदोष दूर केला आहे.

महिन्याभरात उर्वरित सर्व चिमुकल्यांचे दृष्टिदोष दूर करण्यात येणार आहे. (100 children pledge to eliminate visual impairment Ramadan festival activities nashik news)

कठडा भागातील युवा आदर्श मल्टीपर्पज ग्रुप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबलू शेख यांनी हा विडा उचलला आहे. पवित्र रमजान पर्वात विविध प्रकारे गरजूंची मदत करण्यावर भर दिला जातो. बहुतांशी मुस्लिम बांधव आर्थिक मदत करण्यावर भर देतात.

शिवाय किराणा, धान्याचे वाटपही करतात. आपण काही वेगळ्या पद्धतीची मदत करावयाची या विचारातून श्री. शेख यांनी गरजू, निराधार चिमुकल्यांना असणारे दृष्टिदोष दूर करण्याचा संकल्प केला. अनेक चिमुकल्यांना विविध नेत्रविकार उद्भवत आहे.

त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेष करून मुलींना अधिक अडचणी येत असतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत, कुठलाही आधार नसल्याने एखाद्या मुलीस दृष्टिदोष असल्यास तर तिच्या विवाहातदेखील अनेक अडचणी येत असतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Ongoing treatment in infancy.
Success Story : बागलाणच्या दोन लेकींची गगनभरारी! कौतुकाचा वर्षाव

असे प्रकार टाळण्यासाठी चिमुकल्यांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचा निश्चय श्री. शेख यांनी केला. बुधवार (ता.१२) पासून त्यांनी त्यांचा संकल्प प्रत्यक्ष अस्तित्वात आणला. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस १४ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिन्याभराच्या कालावधीत सुमारे १०० शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी देण्याचा प्रयत्न आहे.

"दृष्टिदोष असल्यास कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. यामुळे असा संकल्प केला. दृष्टिदोष असणाऱ्या चिमुकल्यांची पालकांनी संपर्क साधावा."

- बबलू शेख, सामाजिक कार्यकर्ता

"आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. घरात कोणीही कर्ता पुरुष नाही. मुलाची आजी जुने कपडे विक्रीचा व्यवसाय करते. त्यातून घराचा उदरनिर्वाह चालतो. अशात मुलाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. बबलू शेख यांच्यामुळे बुधवारी शस्त्रक्रिया झाली."

- शीतल घोनेकर, चिमुकल्याची आई

Ongoing treatment in infancy.
Technical Education : राज्यात 516 शाळा होणार तंत्रशिक्षण समृद्ध! 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.