MSRTC कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 100 कोटी मंजूर

MSRTC latest marathi news
MSRTC latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून २०२२ मधील वेतनासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ३६० कोटींची मागणी केली होती. सरकारच्या अर्थ विभागाने १०० कोटी वेतनासाठी देण्यास मान्यता दिली आहे.

२०२२-२३ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थसहाय्यतंर्गत १ हजार ४५० कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यातील ७९० कोटी शिल्लक आहेत. त्यातून १०० कोटींची व्यवस्था करण्यात आली. (100 crore sanctioned for salary of MSRTC employees nashik Latest Marathi news)

MSRTC latest marathi news
जिल्हाधिकारी कार्यालयाला खड्ड्यांचा विळखा

अर्थसंकल्पातील मंजूर तरतुदीतून एप्रिल २०२२ च्या वेतनासाठी ३०० कोटी देण्यात आले आहेत. मे २०२२ मधील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३६० कोटी दिले होते. त्यामुळे शिल्लक तरतुदीतून जूनच्या वेतनासाठी ३६० कोटी मिळावेत, अशी विनंती महामंडळाने राज्य सरकारला केली होती.

सरकारच्या विविध सवलत मूल्यांपोटी परिवहन विभागाच्या अर्थसहाय्यतंर्गत १ हजार ४५० कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

MSRTC latest marathi news
हर घर तिरंगा : शासकीय कार्यालयावर यंदा 75 फुटाचा तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.