Nashik News : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील कृषिसेवा विक्री केंद्रांच्या व्यावसायिकांनी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र वेळेवर पाऊस नसल्याने व्यवहार ठप्प आहेत.
त्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. एकीकडे पावसाच्या भरवशावर व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही.
त्यामुळे शेतकरी व व्यापारी घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (100 crores stuck in seeds Fertilizers Agricultural input dealers worried business stopped due to lack of rain Nashik News)
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, लासलगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषिसेवा केंद्र आहे. बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी येथे खते, औषधे खरेदीसाठी येतात.
प्रत्येक वर्षी हंगामात आलेल्या अडचणी व शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन रासायनिक खते, बियाणे कंपनीकडे मागणी नोंदवून आगाऊ रक्कम व्यावसायिक अदा करतात.
त्यासाठी बँकेचे कर्जही बहुतांश व्यावसायिक उचलतात. निफाड तालुक्यात कृषिसेवा केंद्रांचे जाळे अगदी खेडोपाडी पसरले असून, सुमारे एक हजार २०० व्यावसायिक आहेत. यंदा खरिपाचा अंदाज घेऊन व्यापाऱ्यांनी नियोजन केले होते.
मात्र पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यास धजावलेले नाहीत. परिणामी, दुकानदारांकडे बियाणे, खते पडून आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खरिपासाठी मका, सोयाबीन आदी बियाणे मुबलक प्रमाणात आहेत. बियाण्यांची वैधता काही महिन्यांसाठी असल्याने पाऊस न आल्यास गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे.
तालुक्यात अद्याप अवघ्या ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने बियाणे, खते यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
"निसर्गाच्या अवकृपेमुळे बियाणे-खते पडून असून, कृषी दुकानदार अडचणीत आले आहेत. बँकेचे व्याज वाढत चालले आहे. व्यवहार ठप्प आहेत. पाऊस पडला तरच उलाढाल वाढेल."
-रामभाऊ माळोदे, विवेकशील ॲग्रो, पिंपळगाव बसवंत
"पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी पेरणी करणार नाही. त्यामुळे दुकानदारांकडे खते, बियाणे पडून आहेत. वेळेवर पाऊस न झाल्याचा फटका व्यावसायिकांना बसतो आहे."
-सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.