नाशिक : गोदावरी नदीला आलेला पूर (Flood) पाहण्यासाठी अनेक लोक शहरातील पुलावर वाहने उभी करून पाणी पाहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने १४ ऑगस्टपर्यंत पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूने १०० मीटर अंतरावर वाहने उभी करून पूर पाहण्यास बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Comissioner Jayant Naiknavare) यांनी घेतला. (100 meters on both sides of bridge as No Parking Zone nashik latest marathi news)
शुक्रवार (ता.१५) पासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील दिले आहे. शहर व जिल्ह्यात ११ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे शहरात पुराचे पाणी पाहण्यासाठी नाशिककर पुलावर आपली वाहने बेशिस्तीने उभी करत पाणी पाहत आहे.
थेट पुलावर वाहने उभी केली जात असल्याने यामुळे पुलावर वाहतुकीच्या कोंडी होत असून, याचा नाहक त्रास हा इतर वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पुलावर वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून शहरातील होळकर, गाडगे महाराज, रामवाडी, कन्नमवार, बापू, दसक आणि चेहेडी पूल आणि पुलाच्या दोन्ही बाजूकडील १०० मीटर अंतराचा भाग हा ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला आहे.
त्यामुळे वाहनचालक यांना शहरातील आठही पूल व पुलाच्या दोन्ही बाजूकडील १०० मीटर परिसरात १४ ऑगस्टपर्यंत वाहने लावून पाणी पाहण्यात सक्त मनाई केली आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.