Nashik News : थकबाकी भरणाऱ्यांना व्याजावर 100 टक्के सवलत; मालेगाव मनपाकडून कार्यवाही

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मालमत्ता कर व थकबाकीदार यांच्याविरुद्ध जप्तीसारख्या कटू कारवाई करून सक्तीने वसुली करण्यासाठी महानगरपालिकेने जप्ती पथक स्थापन केले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी व संकीर्ण कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ता करधारकांना व्याजावर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती कार्यालयात थकीत घरपट्टी व पाणीपट्टीचा एकरकमी भरणा केल्यास व्याजामध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. (100 percent discount on interest to defaulters Proceedings from Malegaon Municipality Nashik Latest Marathi News)

शहरातील संकीर्ण कर वसुली विभागाकडील थकबाकीदारांनी संकीर्ण कराची थकबाकी रक्कम मुख्यालय येथील संकीर्ण कर विभागामध्ये जावून भरल्यास व्याजामध्ये १०० टक्के सवलत दिली जाईल. करधारकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन गृह व संकीर्ण कर विभागातर्फे करण्यात आले आहे. मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येईल. नळ जोडणी खंडित करुन येणारा खर्च देखील संबंधित मिळकत धारकांकडून सक्तीने वसूल करण्यात येईल.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Nandurbar News: रखडलेल्या रापापुर सिंचन प्रकल्पाचे भाग्य उजळले; 1500 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार

करधारकांना आपला भरणा रोखीने प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर करून त्वरित संगणकीय पावती प्राप्त करून घ्यावी. धनादेशाद्वारे देखील कर भरणा करता येईल. फोन पेद्वारे भरणा करण्यासाठी प्रभाग कार्यालयात क्युआर कोडची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फोन पेद्वारे भरणा केल्यानंतर संबंधित लिपिकांकडून त्वरित संगणकीय भरणा पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Dhule Crime News : अधिकारी मारहाण प्रकरणी; 14 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()