Nashik News : राज्यात जनावरांचे 100 टक्के लसीकरण : लंम्पीग्रस्त पशुपालकांना 28 कोटी रूपयांची भरपाई

 lumpy disease News
lumpy disease Newssakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : संसर्गजन्य लम्पी आजारामुळे राज्यात हजारो गोवंशीय जनावरांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यामुळे बळीराजाला दिलासा देण्यासाठी पशुधन मृत्युमुखी पडलेल्या ११ हजार २१४ पशुपालकांना ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये याप्रमाणे २८ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. (100 percent vaccination of animals in state compensation of Rs 28 crores to cattle farmers affected by lumpy nashik Latest Marathi News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

 lumpy disease News
Nashik News : आठवड्यात मान्यता, महिन्यातच वर्कऑर्डर; आचारसंहितेपूर्वी कामांसाठी दादांचा फॉर्म्युला

राज्यात ९ डिसेंबरअखेर ३५ जिल्ह्यांमधील तीन हजार ९३९ संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३ लाख ५० हजार १७१ बाधित पशुधनापैकी दोन लाख ६७ हजार २२४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एक कोटी ४४ लाख १२ हजार लम्पी प्रतिबंधक लस जनावरांना देण्यात आली आहे. त्यापैकी एक कोटी ३९ लाख ४२ हजार पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार राज्यात १०० टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण पूर्ण झाले आहे.

 lumpy disease News
Nashik News : शहरातील रस्ते होणार काँक्रिटचे!; डांबरीकरणावर फुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.