त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील 100 गावे खावटीवाटप कार्यक्रमापासून वंचित

 Khawti
Khawti
Updated on

मूलवड (जि. नाशिक) : आदिवासी विकास विभागाचा खावटी वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना मात्र ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या बेरवळ, मूलवड, रायते ओझरखेड, देवडोंगरा परिसरातील जवळपास शंभर गावे खावटीवाटप कार्यक्रमापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठा गाजावाजा करत आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते खावटी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील जनता खावटी वाटपाकडे मात्र आस लावून बसली आहे.(100 villages in Trimbakeshwar taluka deprived of khawati distribution program)

कोरोनाकाळात आर्थिक संकटात सापडलेली आदिवासी जनता शेतीची मशागत करताना शेतीवरील खर्च करताना पार मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे या संकटकाळात खावटी योजनेचा तरी आधार मिळेल, या आशेवर संपूर्ण जनता बसली आहे. जवळपास नऊ महिन्यांपासून खावटी योजनेचे कामकाज सुरू असून, याकामी लोकांना फार्म भरण्यासाठी व झेरॉक्स काढण्यासाठी हरसूल, ठाणापाडा येथे जावे लागले. त्यासाठी प्रत्येकी दोनशे ते तीनशे रुपये खर्च आला. पण आजपर्यंत काहीही मिळालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आजमितीला संपूर्ण महाराष्ट्रात खावटी वाटपाचा कार्यक्रम सुरू असून, आमच्या भागाकडे शासन दुर्लक्ष का करतेय, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

मागील वर्षापासून आश्रमशाळा बंद असल्याने सर्व मुले घरीच असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह, कपडे, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय या सर्वांचा अतिरिक्त खर्च वाढल्याने शेतकरी, पालक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लोकप्रतिनिधी व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून परीसरातील गावागावात खावटी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा. जेणेकरून आर्थिक हातभार लागेल व जीवन जगण्यास सुलभ होईल, अशी आदिवासी भागातील नागरिकांची मागणी आहे. कोरोनामुळे आदिवासी भागांतील जनता आर्थिक संकटात सापडली आहे. हाताला काम नाही. शेतीसाठी होणाऱ्या खर्चामुळे खावटीची मदत वेळेत मिळाल्यास आधार मिळेल, असे मत बारीमाळ येथील सुशिक्षित बेरोजगार रोहीदास महाकाळ यांनी मांडले.

(100 villages in Trimbakeshwar taluka deprived of khawati distribution program)

 Khawti
नाशिक : सिडको भागात टोळक्याकडून तिघांवर धारदार शस्त्राने वार
 Khawti
'ओ शेऽऽऽठ'चा धुमाकूळ सुरुच! नाशिकची संगीतकार संध्या पोहचली घराघरांत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()