Uddhav Thackeray Group : पंचवटीतील 100 तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश; शालिमार कार्यालयात प्रवेश सोहळा

Thackeray Sena office bearers and activists present at the entrance ceremony.
Thackeray Sena office bearers and activists present at the entrance ceremony.esakal
Updated on

Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. हे लोकांना आता पटू लागले असून, मोठया प्रमाणात लोक पुन्हा या पक्षात प्रवेश करीत आहेत. हे शुभसंकेतच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन उपनेते सुनील बागूल यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसैनिक महेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पूर्व मतदारसंघातील शंभरहून अधिक तरुणांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. शालिमार कार्यालयात हा दिमाखदार प्रवेश सोहळा पार पडला. (100 youth from Panchvati join Thackeray group nashik political news)

या वेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, गोकूळ पिंगळे, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर, स्वाती पाटील आदींच्या हस्ते शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

पक्षात आलेल्या सर्वांचा सन्मान बाळगला जाईल, असे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर म्हणाले. गद्दार आज कितीही उड्या मारत असले तरी त्यांची खरी स्थिती काय आहे ते त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे आता पश्चात्ताप करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाही, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Thackeray Sena office bearers and activists present at the entrance ceremony.
Life In Balance : रंजले, गांजल्यांच्या मुखी पडो दोन घास! दिव्यांग, वयोवृद्धांना मोफत जेवण देणारे हॉटेल

महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गद्दार चांगलेच तोंडावर आपटतील आणि लोक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूनेच मोठया प्रमाणात कौल देतील आणि त्यावेळीच असली कोण आणि नकली कोण याचा फैसला होईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजय गोसावी, उज्ज्वल मोरे, आकाश महामाने, प्रवीण निकम, यश गोसावी, आयुष भोई, प्रशांत निकम, ओंकार सूर्यवंशी, हितेश मराठे, दर्शन जाधव, संदीप वाघ, शुभम तांबे, किरण मोगल, मधुकर आव्हाड, दत्ता आव्हाड, बाळासाहेब धुमाळ, वैभव कुलकर्णी, ज्ञानेश्वर फड, अमित देशमुख, सुधीर पोळ, ऋषीकेश दंडगव्हाळ,

राकेश गोसावी, विनोद सोनवणे, बाळासाहेब उगलमुगले आदींचा समावेश आहे. पंचवटी परिसरातील शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील निरगुडे यांनी केले. आभार महेंद्र आव्हाड यांनी मानले.

Thackeray Sena office bearers and activists present at the entrance ceremony.
Success Story : मीलनच्या स्वप्नांना मिळाले आकाश; सामान्य कुटुंबातील तरुण झाला डॉक्टर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()