Monsoon Update: वरुणराजाच्या हजेरीत 101 टक्क्यांचा ‘शॉर्टफॉल’! धरणातील जलसाठा 45 टक्के कमी

Monsoon rain
Monsoon rainesakal
Updated on

Monsoon Update : वरुणराजा जिल्हावासीयांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर टाकत चालला आहे. गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत १७४.४ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला होता. दिंडोरी तालुक्यात त्रिशतकी, तर बागलाण, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड, चांदवड, देवळा तालुक्यांत द्विशतकाहून अधिक ‘बॅटिंग' केली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पावसाचा १०१ टक्क्यांहून अधिक ‘शॉर्टफॉल’ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (101 percent shortfall in monsoon rain presence 45 percent less water storage in dam nashik)

पावसाच्या अभावामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४५ टक्के कमी म्हणजे, आतापर्यंत ३५ टक्के जलसाठा झाला आहे. सततच्या पावसामुळे दारणात ६५, भावलीत ७०, हरणबारीत ५९, मुकणेत ५३, तर माणिकपुंजमध्ये ४७, चणकापूरमध्ये ४५, गंगापूरमध्ये ४२ टक्के जलसाठा झाला आहे.

हा अपवाद वगळता इतर धरणांतील जलसाठा कमी आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ९१ टक्के जलसाठा असताना २५० क्यूसेक विसर्ग गोदावरीमध्ये सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये इगतपुरी तालुक्यात १६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

इगतपुरी मंडळामध्ये ३३.३, घोटीत १३.५, वाडीवऱ्हेमध्ये ११.८, नांदगाव सदो आणि टाकेदमध्ये प्रत्येकी ११.५, धारगावमध्ये १९.५, मखमलाबादमध्ये २०.८, नाशिक मंडळामध्ये १०.८ मिलिमीटर पावसाची नोंद चोवीस तासांत झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Monsoon rain
Parliment Monsoon Session: अधिवेशनात 'समान नागरी विधेयका'चा समावेश नाहीच; पाहा संपूर्ण यादी

तालुकानिहाय आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये आणि आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून, (कंसात तालुक्यात गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव- ०.९-८०.४ (१९१.४), बागलाण- १.१-७०.६ (२०६.९), कळवण- १.३-८८.६ (२६४.७), नांदगाव- २.५-५६.४ (१५२.२), सुरगाणा- ५.४-८१.१ (२०३.९), नाशिक- ७.९-५३.७ (१७०.१), दिंडोरी- २.६-१०९.३ (३३९.२), इगतपुरी- १६.९-५५ (७९.२), पेठ- ८.१-७३ (२४५.७), निफाड- २.७-७८.१ (२०८.२), सिन्नर- ३-५०.६ (१४०.१), येवला- २.७-७८.४ (१३१.९), चांदवड- १.५-५१.७ (२३१.२), त्र्यंबकेश्‍वर- ७.२-५८ (१४१), देवळा- १.२-७४.६ (२२२.३).

Monsoon rain
Monsoon Session Updates: दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज संपलं; दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लीकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.