नाशिक शहरात ११८४ धोकादायक घरे, वाडे

Old houses in nashik
Old houses in nashikesakal
Updated on
Summary

सुस्थितीतील घरेदेखील कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : पावसामुळे घरे कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात शहरात ११८४ धोकादायक घरे, जुन्या इमारती व वाडे आढळून आले आहेत. त्या धोकादायक मिळकतधारकांना धोकादायक घरे, संबंधित भाग उतरवून घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. (1184 dangerously old buildings have been found in Nashik city)

पावसाळी पूर्व कामेही रखडलीयेत

एकीकडे कोरोनाविरोधात (Fight with Corona) लढाई होत असताना दुसरीकडे पावसाळा तोंडावर आल्याने या कालावधीमध्ये धोकादायक घरे, वाडे कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर धोकादायक घरे, जुन्या इमारती व वाड्यांचे सर्वेक्षण केले. त्यापूर्वी मागील आठवड्यात यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत धोकादायक घरे, जुन्या इमारती व वाड्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले होते. वास्तविक एप्रिल, मे महिन्यात नियोजन होणे अपेक्षित होते, मात्र ते न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कामात गुंतल्याने नियमित कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळी पूर्व कामे अद्यापही रखडलेली आहे. त्यामुळे कामांना विलंब झाल्यास संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर नगररचना विभागाने सर्वेक्षण करून विभागीय अधिकाऱ्यांमार्फत ११८४ धोकादायक घरे, वाड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. घरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याबरोबरच धोकादायक मिळकत उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती पश्‍चिम व पूर्व विभागात आहे. मागील वर्षी ७२३ धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली होती. यावर्षी सुमारे साडे चारशे धोकादायक मिळकती वाढल्या आहेत. सर्वात कमी धोकादायक इमारती सातपूर विभागात आढळून आल्या आहेत.

Old houses in nashik
दर्जाअभावी कोविड सेंटरमधील जेवण जाते थेट कचऱ्यात!

इमारत मालकांना ताकीद

पावसाळ्यात वाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहे, तर आता वाड्यांबरोबरच सुस्थितीतील घरेदेखील कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतीत संरचनात्मक परिक्षण न केल्यास व सदरची मिळकत पडून जीवितहानी झाल्यास संबंधित मालक किंवा भाडेकरूवर जबाबदारी राहणार असल्याची ताकीद देण्यात आली आहे.

(1184 dangerous houses and wade in Nashik city)

Old houses in nashik
पोर्टल अपग्रेडेशनमुळे शहरात वाढतोय मृतांचा आकडा; प्रशासनाची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()